पुण्यात राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक, महायुतीला धक्का

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 15 पैकी 10 जागा मिळवत राष्ट्रवादीने जिल्ह्यात कमबॅक केलं (Pune Vidhansabha Result 2019) आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक, महायुतीला धक्का
Follow us
| Updated on: Oct 31, 2019 | 4:55 PM

पुणे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे पुणे शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पानीपत झाले (Pune Vidhansabha Result 2019) होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तेच चित्र होते. राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या या जिल्ह्यावर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केलं. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 15 पैकी 10 जागा मिळवत राष्ट्रवादीने जिल्ह्यात कमबॅक केलं (Pune Vidhansabha Result 2019) आहे.

शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्याला 2014 मध्ये सेना भाजपने जोरदार सुरुंग लावला होता. यात 21 पैकी 15 जागा युतीने मिळवत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पुणे आणि अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड पालिकाही भाजपने ताब्यात घेतली. मात्र शरद पवारांच्या झंझावातात या निवडणुकीत महायुतीला धक्का देत जिल्ह्यात राष्ट्रवादीने 15 पैकी 10 जागांवर विजय मिळवला. दरम्यान पुणे महापालिकेत भाजपच्या 98, शिवसेनेच्या 10, मनसे 02, राष्ट्रवादी 41 आणि काँग्रेस 11 असे संख्याबळ (Pune Vidhansabha Result 2019) आहे.

पुणे जिल्ह्यातील विधानसभा पक्षीय संख्याबल

पक्ष विधानसभा निवडणूक 2014 विधानसभा निवडणूक 2019
     
भाजप 12 9
शिवसेना 3 0
काँग्रेस 1 2
राष्ट्रवादी 3 10
इतर 2 0

पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या. यात हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे दोन हजार मतांनी निवडून आले. तर दौंडमध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांचा 618 मतांनी पराभव केला. राज्यात सर्वाधिक मताधिक्क्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार निवडून (Pune Vidhansabha Result 2019) आले.

राष्ट्रवादीचे शहर आणि जिल्ह्यातील विजयी उमेदवार

  • हडपसर – चेतन तुपे
  • वडगाव शेरी – सुनील टिंगरे
  • बारामती – अजित पवार
  • इंदापूर – दत्ता भरणे
  • आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
  • शिरूर – अशोक पवार
  • खेड – दिलीप मोहिते पाटील
  • जुन्नर – अतुल बेनके
  • मावळ – सुनील शेळके
  • पिंपरी – अण्णा बनसोडे

पुणे शहर जिल्ह्यात राष्ट्रवादीने घेतलेली मुसंडी निश्चित आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी उभारी देणारी आहे. त्यामुळे विधानसभेचे लागलेले निकाल भाजप सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निश्चित आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.