Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक, गिरीश बापट यांचे खासमखास; कोण आहेत हेमंत रासणे?

चिंचवडमधून अश्विनी जगताप हा घरातीलच उमेदवार दिला आहे . तर कसब्यातून समोर आलेलं नवं नाव हेमंत रासणे हे नेमके कोण आहेत? यावरून चर्चा सुरु झाली आहे.

गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक, गिरीश बापट यांचे खासमखास; कोण आहेत हेमंत रासणे?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 3:04 PM

योगेश बोरसे, पुणेः विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) दारूण पराभव झाल्यानंतर भाजप आता ताकही फुंकून पिणार असल्याचं म्हटलं जातंय. पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि चिंचवड (Pimpari Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकीचा उमेदवार निवडताना भाजप कार्यकारिणीच्या अनेक बैठका पार पडल्या. अनेक पैलू खंगाळून पाहिल्यानंतर आज अखेर भाजपने कसबा आणि चिंचवड येथील उमेदवारांची नावं जाहीर केली. कसबा पेठची जागा भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झाली होती. येथे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपने कसब्यातून हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

चिंचवडमधून अश्विनी जगताप हा घरातीलच उमेदवार दिला आहे . तर कसब्यातून समोर आलेलं नवं नाव हेमंत रासणे हे नेमके कोण आहेत? यावरून चर्चा सुरु झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासणे थेट दगडू शेठ गणपतीच्या दर्शनासाठी गेले. सच्चे गणेशभक्त म्हणून ते लोकप्रिय आहेत.

कोण आहेत हेमंत रासणे?

  •  हेमंत रासणे हे सलग चारवेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक
  •  सलग तीनवेळा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पदावर त्यांनी कार्य केलं आहे.
  • गणेश मंडळाच्या माध्यमातून कसब्यात रासणे यांचं काम मोठं आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आ हेत.
  •  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि खासदार गिरीश बापट यांचे ते निकटवर्तीय आहेत.

‘संधीचं सोनं करू दाखवेन…’

भाजपाने विधानसभा निवडणुकीची संधी दिली आहे. या संधीचं मी सोनं करून दाखवणार. कसबा पेठ पोटनिवडणूकित मी विक्रमी मतांनी निवडून येणार.. अशी प्रतिक्रिया हेमंत रासणे यांनी दिली आहे. एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिली त्याचं मी सोनं करून दाखवेन.. आम्हाला रणनीती करण्याची गरज नाही, सर्वसामान्य नागरिकांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. नगरसेवक आणि त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मी कसब्यात काम केलं आहे, त्याला जनता आशीर्वाद देईल, अशी प्रतिक्रिया हेमंत रासणे यांनी दिली आहे.

शैलेश टिळकांची नाराजी

हेमंत रासणे यांना भाजपने तिकिट द्यायचं ठरवल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. यावरून कुणाचीही नाराजी नसल्याचं ते म्हणाले. मात्र मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. एवढ्या आजारपणातही मुक्ता टिळक यांनी पक्षासाठी काम केलं. त्यांच्या कामावर अन्याय झाल्याची भावना शैलेश टिळक यांनी बोलून दाखवली. ही प्रतिक्रिया देताना ते भावूक झाले होते. मात्र अखेरीस पक्षाला साथ देणार असल्याचं त्यांनी कबूल केलं.

कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.