PWD मध्ये खोटी बिलं मंजूर, घोटाळ्याची तार नांदेडपर्यंत, भाजपचा अशोक चव्हाणांवर निशाणा

"राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली"

PWD मध्ये खोटी बिलं मंजूर, घोटाळ्याची तार नांदेडपर्यंत, भाजपचा अशोक चव्हाणांवर निशाणा
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 4:26 PM

मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर (Maharashtra PWD) गंभीर आरोप केले आहेत. “राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली”, असा थेट आरोप अतुल भातखळकरांनी केला. भातखळकरांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar) हल्लाबोल केला. (PWD approves fake bills, scams link to Nanded, BJP targets Ashok Chavan)

अतुल भातखळकर म्हणाले, “राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा झाला आहे. खोटी बिलं दाखवण्यात आली. राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली. 2010 ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतची ही बिलं आहेत. दोन ते तीन महिन्यात सर्व नियम धाब्यावर बसवत, सगळी बिलं पास केली. या बिलांचं पेमेंट खोटं आहे. ही बिलं पास झाली नव्हती, आता पास कशी झाली? याची चौकशी करायला हवी. ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा 15 दिवसांत कोर्टात जाणार”

एकट्या मुंबईतून 70 केटींची बिलं पास झाली. या घोटाळ्याचे तार नांदेडपर्यंत आहेत, असं म्हणत भातखळकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

कोरोना काळात पैस नव्हते तर मग बिलं पास कशी केली? ही बिल मंत्र्यांच्या बंगल्यांची, मंत्रालयातील कामांची, सरकारी कामांची बिलं. मुळात ही बिलं खोटी आहेत. ३५ टक्के कमिशनने ही बिलं ठाकरे सरकारने पास केली असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.

सामनावर हल्लाबोल 

जे जगाला चारित्र्य शिकवतात त्यांच्याकडून ज्या भाषेचा वापर होतोय, हे चुकीचे आहे. सामनाच्या संपादक या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे ही भाषा शोभणारी नाही. हायकोर्टाने चपराक लगावलीये तरी यांना कळत नाही, असं भातखळकर म्हणाले.

मेहबुब शेखप्रकरणावरुन राष्ट्रवादीवर निशाणा

राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस तोंड उघडत नाही. महिलांच्या अत्याचारावर खासदार सुप्रिया सुळे इतर नेते मोर्चे काढतात, आणि इथे मात्र तोंड बंद होतं. हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

(PWD approves fake bills, scams link to Nanded, BJP targets Ashok Chavan)

संबंधित बातम्या 

बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे वैचारिक सुंता, कॅलेंडरवरुन भाजपचा शिवसेनेवर हल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.