BJP MLA : भाजपा आमदाराकडून हनुमान, सरस्वतीवर प्रश्नचिन्ह, तर “लक्ष्मीपूजनाने धन मिळत, तर मुसलमान अब्जोपती होत नाहीत का?” असाही सवाल

BJP MLA : भाजपा आमदाराने दिवाळीपूर्वीच वादग्रस्त वक्तव्याची लड लावली आहे..त्यामुळे हे आमदार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत..

BJP MLA : भाजपा आमदाराकडून हनुमान, सरस्वतीवर प्रश्नचिन्ह, तर लक्ष्मीपूजनाने धन मिळत, तर मुसलमान अब्जोपती होत नाहीत का? असाही सवाल
वादग्रस्त वक्तव्यImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 10:53 PM

पाटणा : आमदार (MLA), खासदारांना(MP) सार्वजनिक जीवनात बेताल वक्तव्य (Absurd statement)करुन चालत नाहीत. त्यांना सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोखा जपणे आवश्यक आहे. पण भाजपच्या (BJP) एका आमदाराने ऐन दिवाळीतच (Diwali) वादग्रस्त वक्तव्याची लड लावून दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तर हे भाजपचे आमदार आहेत बिहारमधील. त्यांचे नाव आहे ललन पासवान. भागलपूरमधील पीरपैंती हा त्यांचा मतदार संघ आहे. त्यांनी थेट दिवाळीत होणाऱ्या लक्ष्मी पूजनावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

एवढ्यावरच थांबतील ते आमदार महोदय कसले, त्यांनी लक्ष्मी पूजनासह सरस्वती पूजा आणि हनुमान पुजेवरही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

हे सुद्धा वाचा

जर लक्ष्मी पूजनामुळेच धन मिळाले असते तर मुसलमान अरबपती आणि खरबपती झाले नसते, असे वक्तव्य आमदार पासवान यांनी केले. एवढ्यावरच न थांबता सरस्वतीची पूजा केली जाते, मग मुसलमान विद्वान नसतात का? ते IAS आणि IPS होत नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.

त्यांनी दिवाळीवरही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दीपावली आता येत आहे. तर मग हे सांगा की, काय मुसलमान व्यक्तीकडे धन नसते? काय ते अरबपती, खरबपती नसतात? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

भाजपचे आमदार ललन पासवान यांनी बजरंगबलींच्या पुजेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. हनुमान हे शक्तीदाता आहेत. ते शक्ती देतात. तर मग मुस्लीम वा ख्रिश्चन लोक ताकदवान नसतात का? असे ते म्हणाले.

अमेरिकेत हनुमान मंदिर नाही. तिथे हनुमानाची पूजा करण्यात येत नाही. तर याचा अर्थ अमेरिका शक्तिशाली राष्ट्र नाही का? हनुमानाची पूजा न करताच अमेरिका शक्तिशाली राष्ट्र झाले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

‘मानलं तर देव नाहीतर दगड’ असे वादग्रस्त वक्तव्य करत, त्यांनी जोपर्यंत मानले तोपर्यंतच आत्मा-परमात्म्याची कथा असल्याचा दावा केला आहे. जर तुम्ही या गोष्टी मानल्याच नाही तर तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. तार्किक शक्तीचा जेवढा विकास होईल, तेवढी दृष्टी वैज्ञानिक होईल असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या या वक्तव्यांमुळे वाद पेटला, तेव्हा ते बॅकफूटवर आले. आपण देव, ईश्वर मानतो. सर्व देवांची पूजा करतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मला बदनाम करण्यासाठीच विरोधक माझ्या वक्तव्याआधारे वाद पेटवत असल्याचा दावा त्यांनी केला. एका पोर्टलवरील संवाद कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.