रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवलाय, स्वतः थांबून उतरवून घे, आबांच्या मुलाला अजितदादांचा फोन, रोहित पाटलांची मध्यरात्री धडपड

23 जंबो टाक्या आणि 2 ड्युरा टाकी ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले (Rohit Patil Oxygen Ajit Pawar )

रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवलाय, स्वतः थांबून उतरवून घे, आबांच्या मुलाला अजितदादांचा फोन, रोहित पाटलांची मध्यरात्री धडपड
अजित पवार यांचा रोहित पाटील यांना फोन
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 4:42 PM

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोननंतर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) मध्यरात्री ऑक्सिजन घेऊन ग्रामीण रुग्णालयात गेले. तासगावातील रुग्णांसाठीही त्यांनी ऑक्सिजनची सोय केली. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (R R Patil) यांच्या मुलाची रुग्ण वाचवण्यासाठी धडपड पाहून उपस्थितांचे मन हेलावले. (R R Patil Son Rohit Patil unloads Oxygen Cylinders in Tasgaon Sangli as Ajit Pawar Calls him midnight)

अजित पवारांचा फोन काय?

रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला. ‘रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरवून घे’ अजितदादांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरवून घेतला. त्यांनतर यातील 23 जंबो टाक्या आणि 2 ड्युरा टाकी ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनभावी कोरोनाग्रस्त रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे.

तासगावात कोरोनाचे थैमान

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज शंभरहून अधिक जणांना कोरोनाची बाधा होत आहे. तासगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य खासगी ठिकाणी कोरोना हॉस्पिटल सुरु करण्यात आली आहेत. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजूंना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करुन देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही जिल्हाभर बेड शोधताना फरफट होत आहे.

पाटील कुटुंबामुळे 56 ऑक्सिजनेटेड बेड

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे.

रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी

तासगावतही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करुन घ्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरली होती.

अखेर काल मध्यरात्री अजित पवारांनी रोहित पाटील यांना फोन केला. ‘रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरवून घे’ या अजितदादांच्या सूचनेनंतर रोहित पाटील स्वतः मध्यरात्री घरातून बाहेर पडले. भारत गॅसच्या विवरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी ऑक्सिजनचा टँकर उतरवून घेतला.

संबंधित बातम्या :

रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करा, कार्यकर्त्यांचं शरद पवारांना पत्र

(R R Patil Son Rohit Patil unloads Oxygen Cylinders in Tasgaon Sangli as Ajit Pawar Calls him midnight)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.