Radhakrishna Vikhe Patil : काहीही झालं दाखव केंद्राकडे बोट, अडीच वर्ष मविआच्या मंत्र्यांनी भजे तळले का? विखे पाटलांचा खोचक टोला

भाजप (BJP) नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. किमान समान कार्यक्रमात फक्त वसुलीच सुरू होती असं त्यांनी म्हटलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil : काहीही झालं दाखव केंद्राकडे बोट, अडीच वर्ष मविआच्या मंत्र्यांनी भजे तळले का? विखे पाटलांचा खोचक टोला
राधाकृष्ण विखे पाटीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 2:51 PM

संगमनेर : भाजप (BJP) नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. किमान समान कार्यक्रमात फक्त वसुलीच झाली बाकी काहीच झाले नाही. या सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालवले, ओबीसीचे राजकीय आरक्षणही घालवले. महाराष्ट्राने एवढं भ्रष्टाचारी सरकार कधी पाहिलं नव्हतं असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे. पुढे बोलताना विखे पाटलांनी म्हटलं की गेल्या अडीच वर्षात काहीही झालं तरी महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राकडे बोट दाखवलं जात होतं. मग मविआचे मंत्री काय करत होते भजे तळत होते का? असा खोचक टोला देखील यावेळी  विखे पाटलांनी लगावला आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थ शत-प्रतिशत भाजपच जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

दरम्यान यावेळी विखे पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. माझे कुटुंब तूमची जबाबदारी म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच निळवंडे धरणाचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. त्याचे श्रेय दुसरे कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. उजवा आणि डाव्या‌ कालव्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही म्हणत त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना देखील टोला लगावला आहे. पूर्वी आपण पारंतत्र्यात होतो अशी तालुक्यातील जनतेची भावना झाली होती. मात्र आता त्यांना स्वातंत्र्य मिळाल्या सारखे वाटत आहे असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

वाळू माफियांवर कडक कारवाई

यावेळी बोलताना महसूल मंत्री विखे पाटलांनी वाळू माफियांना देखील इशारा दिला आहे. वाळू माफियांना सोडणार नाही. वाळू माफीयांचा माज उतरवणार. वाळू माफियांवर कडक कारवाई करणार, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नवीन धोरण तयार करणार,  असा इशारा यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे. त्यामुळे आता पुढील काळात वाळूच्या तस्करीवर चाप लागण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.