Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसनं स्वाभिमान कधीच गहाण टाकला, केवळ अर्थप्राप्तीसाठी महाविकास आघाडीत; विखे पाटलांचा घणाघात
राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते. यावेळी राज्यात आलेल्या नवीन सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. लोकांच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे म्हटले.
शिर्डी, अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) काँग्रेसला नगण्य स्थान होते. फक्त अर्थप्राप्तीसाठी काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते. काँग्रेसने आपला स्वाभिमान कधीच गहाण टाकला आहे. काँग्रेसला राज्यात पूर्णपणे अनुल्लिखित करण्यात आले होते, अशी घणाघाती टीका भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते शिर्डीत बोलत होते. गुरूपोर्णिमा उत्सवाच्या (Guru Purnima) निमित्ताने त्यांनी आज शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राला लोकांचे सरकार मिळाले असून जनतेच्या अपेक्षा वाढल्याचे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. मागील अडीच वर्षात राज्याची अधोगती झाली. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विश्वासघाताने आलेले सरकार होते, अशी टीकादेखील विखे पाटील यांनी केली.
‘साईबाबांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी’
राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते. यावेळी राज्यात आलेल्या नवीन सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. लोकांच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील. कोविडचा संपूर्ण नायनाट व्हावा, राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साईबाबांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी, त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी साई चरणी प्रार्थना त्यांनी केली. तर महाविकास आघाडी सरकारवर टीकही केली. विश्वासघात करून आलेले सरकार आता पडले आहे. या सरकारमध्ये कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता. तर काँग्रेस दुर्लक्षित होती. महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊन काँग्रेसने आपला स्वाभिमान गहाण टाकला, अशी टीका त्यांनी केली.
‘नव्या सरकारचे प्रशासनावर नियंत्रण’
नव्या सरकारचे अभिनंदन करताना ते म्हणाले, की आता राज्याला सक्षम असे सरकार मिळाले आहे. राज्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे. मात्र यंत्रणा सतर्क, प्रशासन जागरूकतेने काम करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनावर योग्य नियंत्रण आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया होत राहील. हे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करू द्या, असे ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीसह यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?