राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस छोडो कार्यक्रमावर लक्ष द्यावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनावरांवरील लम्पी स्किन आजाराच्या पाहणी केली.
![राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस छोडो कार्यक्रमावर लक्ष द्यावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस छोडो कार्यक्रमावर लक्ष द्यावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/08202711/ghgvh.jpg?w=1280)
जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची त्यांनी खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करत आहेत. पण त्यांनी ही यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडो कार्यक्रम सध्या देशभर सुरू आहे, त्यावर काम केलं पाहिजे. त्याची चिंता त्यांनी करायला हवी, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनावरांवरील लम्पी स्किन आजाराच्या पाहणी केली.
सत्ता गेल्याचं वैफल्य काही लोकांना झालंय. त्यामुळे ते वैफल्यातून राज्य सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
प्रत्येक विरोधकाच्या टीकेला उत्तर दिलं पाहिजे असं काही नाहीये. राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करत आहे. चांगले निर्णय घेत आहे. सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतलीये. मागच्या सरकारसारखं आम्ही माझे कुटुंब तुमची जबाबदारी यासारखं वागणार नाही, असं म्हणत त्यांनी एकाचवेळी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक आणि विरोधकांवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा हा 150 दिवसांचा प्रवास असणार आहे. 12 राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. एकूण 3570 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे.