मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल

भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल
राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 2:36 PM

अहमदगर : भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजामध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे खासदार संभाजी छत्रपती यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकारनं केली नसल्याची टीका विखे पाटील यांनी केलीय. संभाजी छत्रपती यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत एकाही आश्वासनाची सरकारने पू्र्तता केलेली नाही. मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,अशी टीका विखे पाटील यांनी केलीय. मराठा मंत्र्यांना समाजात ‌तोंड दाखवायला त्यांना जागा नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे देवून समाजाच्या प्रश्नासोबत आहोत हे दाखवून द्यायला हवं, असं म्हटलंय.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर एकही पूर्तता ‌झाली नाही. राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केलाय. सरकारने समाजाची फसवणूक केलीय. आझाद मैदानात संभाजीराजेंनी जे आंदोलन सुरू केलय त्यास‌ माझा संपूर्ण पाठिंबा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

शिवसेना मराठी माणूस मराठी माणूस करतेय मात्र मराठी माणसाच्या‌ भावनेच्या आधारावर त्यांनी ‌सत्ता मिळवली. तोच मराठी माणुस पूर्णपणे उद्धवस्त आणि निराधार झालाय मराठी माणसाच्या स्थितीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

अजित पवारांनी मंत्रिमंडळात राहू नये ही मराठा समाजाची भावना

अजित पवार बेजबाबदार पणे विधाने करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांच्या विधानाचा निषेधच आहे. नैतिकता शिल्लक नसल्याने ते बेजाबदार विधाने ‌करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळातच राहू नये, अशी मराठी समाजाची‌ भावना आता झालीय, असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

इतर बातम्या:

काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी

अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.