विखेंना धक्का, माजी IAS मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई: राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंबीय काँग्रेसमध्ये खुश नसल्याचं दिसतंय. कारण पुत्र सुजय विखे पाटील यांनी आई-वडील काँग्रेसमध्ये असले म्हणून मी सुद्धा त्याच पक्षात राहावं असं नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहिणीचे पती आणि निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी थेट राष्ट्रवादी […]

विखेंना धक्का, माजी IAS मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई: राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंबीय काँग्रेसमध्ये खुश नसल्याचं दिसतंय. कारण पुत्र सुजय विखे पाटील यांनी आई-वडील काँग्रेसमध्ये असले म्हणून मी सुद्धा त्याच पक्षात राहावं असं नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहिणीचे पती आणि निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.

संभाजी झेंडे यांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या मंचावर झेंडे यांचा राजकारणात प्रवेश होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सासवड इथे शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यात संभाजी झेंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या जावयाच्या हातात राष्ट्रवादीचं “घड्याळ” पाहायला मिळणार आहे.

एकीकडे शरद पवार – विखे कुटुंबाचा राजकीय संघर्ष सर्वज्ञात असताना, राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यांनाच राष्ट्रवादीने फोडल्याने हा संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.

कोण आहेत संभाजी झेंडे?

  • संभाजी झेंडे हे कर्तव्यदक्ष सनदी आधिकारी म्हणून ओळखले जात
  • 37 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर ते 30 एप्रिल 2017 मध्ये निवृत्त झाले
  • दिवे घाटातील दिवे हे झेंडे कुटुंबाचं मूळ गाव. शेतकरी कुटुंबात 17 एप्रिल 1957 रोजी संभाजी झेंडे यांचा जन्म झाला
  • संभाजी झेंडे हे 5 जण भाऊ आहेत
  • शालेय शिक्षण दिवे गावातच झालं, त्यानंतर त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी मिळवली.
  • MSC अग्री, LLB अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.
  • 1980 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेत पास होऊन, प्रशासकीय सेवेत रुजू झाले.
  • 1993 मध्ये ते पदोन्नतीने आयएएस झाले
  • त्यांनी शासनाच्या विविध विभागात उल्लेखनीय काम केलं.

सुजय विखेंच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत.मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जातो. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच घरात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे लोकसभा लढण्याच्या तयारीत आहे, मात्र सुजय विखे कुठल्या पक्षाकडून लढणार याबाबत अहमदनगरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्यावेळी म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून राजीव राजळे लढले होते. राजीव राजळे यांचे गेल्या वर्षी निधन झाले. सध्या भाजपचे दिलीप गांधी हे या जागेवरुन विद्यमान खासदार आहेत.

सुजय विखे पाटील यांनी राजकीय प्रवेशाची जोरदार तयारी केलीय. मात्र, सुरुवात काँग्रेसमधून करणार की, भाजपची वाट धरणार, की आणखी कोणत्या पक्षाची निवड करतात, याबाबत संदिग्धतात कायम आहे.

संबंधित बातम्या 

आई-वडील काँग्रेसमध्ये, म्हणून काय झालं? मी थांबणार नाही : सुजय विखे पाटील  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.