राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देशावर ओझे : संजय राऊत

नाशिक : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींवर टीका केली आहे. धोरण आणि कामावर टीकेऐवजी राऊत यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधीना देशावरील ओझे म्हटले. ते नाशिकमध्ये विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. राऊत पुढे म्हणाले, “राहुल गांधी पंतप्रधान मोदींना जेलमध्ये […]

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देशावर ओझे : संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

नाशिक : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींवर टीका केली आहे. धोरण आणि कामावर टीकेऐवजी राऊत यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधीना देशावरील ओझे म्हटले. ते नाशिकमध्ये विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

राऊत पुढे म्हणाले, “राहुल गांधी पंतप्रधान मोदींना जेलमध्ये टाकू म्हणत आहेत. पण त्यांनी आधी मेव्हण्याला सोडवावे. मेव्हणा रॉबर्ट वाड्रांनी हजारो कोटींच्या जमिनी लुटल्या आहेत.”

यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियांका असे दोन गट पडल्याचाही दावा केला.

‘राहुल गांधींची अक्कल तपासली पाहिजे’

राहुल गांधी 72 हजार रुपये देणार असल्याचे सांगतात. मात्र, तेवढे आकडे राहुल गांधींना मोजता तरी येणार आहे का? असा प्रश्न विचारत राऊत यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. तसेच राहुल गांधींची अक्कल तपासली पाहिजे, असे वक्तव्य केले.

राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना ज्यांचा एक पाय तुरुंगात, तर दुसरा बाहेर आहे त्यांना तुम्ही निवडून देणार का? असा प्रश्न विचारला. तसेच शिवसेनेच्या वाघासमोर कोणीही टिकणार नाही, असा दावाही केला.

‘राष्ट्रद्रोहींना लाथा मारुन बाहेर काढून देऊ’

पाकिस्तानी आणि बांग्लादेशी नागरिक पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करत आहेत. ते लोक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची वोटबँक आहे. मात्र, राष्ट्रद्रोहींना आम्ही ठेवणार नाही, त्यांना लाथा मारुन बाहेर काढून देऊ, असेही मत राऊत यांनी व्यक्त केले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.