‘कोरोना’ संकटामुळे पुढच्या वेळी भेटू, राहुल गांधींचा नाना पटोलेंना निरोप

| Updated on: May 28, 2020 | 11:11 AM

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र ही चर्चा तूर्तास टळली आहे. (Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

कोरोना संकटामुळे पुढच्या वेळी भेटू, राहुल गांधींचा नाना पटोलेंना निरोप
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट टळली. ‘कोरोना’ संकटामुळे आपण पुढच्या वेळी भेट घेऊ, असा निरोप राहुल गांधी यांच्याकडून नाना पटोले यांना देण्यात आला. (Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

नाना पटोले दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी परवा (मंगळवार 26 मे) दिल्लीला रवाना झाले होते. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही चर्चा तूर्तास टळली आहे.

हेही वाचा : कोरोना लढाईत आम्ही आपल्यासोबत, राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन

महाराष्ट्रात शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र काँग्रेस नेत्यांच्या मनात हे सरकार “आपलं नाही, शिवसेनेचं” असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून फेर धरत होत्या.

नाना पटोले काय म्हणाले होते?

राज्यातील विधानसभा अधिवेशन सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील सरकार कोणाचे आहे, असा प्रश्न विचारला जातो. मात्र हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे. निर्णय सर्व पक्ष मिळून घेतात, त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला अधिकार नाहीत, असे मत राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे, यावर मी बोलणे योग्य नाही. राज्यपालांच्या माध्यमातून सरकार पाडणे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची खेळी करणे चुकीचे आहे, असे मत नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत व्यक्त केले होते.

महाराष्ट्रात आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही : राहुल गांधी

“महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे, मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यात फरक आहे”, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली होती. (Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

 

संबंधित बातमी :

महाराष्ट्रातील सरकार कुणाचे? दिल्लीत पोहोचताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले….

(Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)