महागठबंधनच्या व्हॉट्सअप ग्रुपची चॅटिंग व्हायरल, देवेगौडांवर मायावती भडकल्या

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. 23 मे रोजी निकालही जाहीर होईल. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षांना एकत्र आणलं जातंय. या सर्व पक्षांशी ताळमेळ साधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक आयडिया सुचली आणि त्यांनी सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. याबाबतचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा फक्त एक विनोदी व्हिडीओ […]

महागठबंधनच्या व्हॉट्सअप ग्रुपची चॅटिंग व्हायरल, देवेगौडांवर मायावती भडकल्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. 23 मे रोजी निकालही जाहीर होईल. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षांना एकत्र आणलं जातंय. या सर्व पक्षांशी ताळमेळ साधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक आयडिया सुचली आणि त्यांनी सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. याबाबतचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा फक्त एक विनोदी व्हिडीओ असला तरी तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

या व्हिडीओचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचंही सोशल मीडियावर सांगितलं जातंय. पण पोट धरुन हसायला लावणारा हा व्हिडीओ आहे. “राहुल गांधी ग्रुप तयार करताच पहिला मेसेज करतात, हा आपला महागठबंधनचा ऑफिशिअल ग्रुप आहे, सर्व विरोधी पक्ष नेत्यांनाही अॅड केलंय. कुणी सुटलं असेल तर प्लीज अॅड करा.” इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होतं, पण मध्येच एक ट्वीस्ट आला.

राहुल गांधींचा मेसेज वाचताच कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी त्यांचे वडील एचडी देवेगौडा यांना अॅड करतात. अॅड केल्यानंतर एचडी कुमारस्वामी पहिला मेसेज करतात, “डॅड, हा ग्रुप आम्ही यासाठी केलाय, की तुम्हाला पंतप्रधान करता यावं.”

कुमारस्वामींचा हा मेसेज वाचल्यानंतर बसपाच्या अध्यक्ष मायावती चांगल्याच भडकल्या. मायावतींनी मेसेज केला की, “माननीय देवेगौडाची, आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्हाला पंतप्रधान नाही करु शकत.”

सोशल मीडियावर राजकीय नेत्यांवर मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. पण पोट धरुन हसायला लावणारा हा व्हिडीओ लोकप्रिय झालाय.

पाहा व्हिडीओ

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.