नागपूर : नॅशनल हेराल्ड केस (National Herald case) प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशात विविध राज्यात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात येतेय. अशास्थितीत आता काँग्रेस नेत्यांचा तोल गेल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही नागपूरमध्ये (Nagpur) काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदींवर जहरी टीका केलीय. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.
नागपूरमध्ये ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनावेळी बोलताना शेख हुसेन यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. शेख हुसेन म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी तेरा वही हाल होगा, जैसे कुत्ते की मौत होती है, ऐसे नरेंद्र मोदी की मौत होगी’. भले यासाठी मला हजार नोटीस मिळतील. मला त्याची चिंता नाही. आम्ही लढत आलो आहोत आणि पुढेही लढत राहू. शेख हुसेन यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हुसेन यांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केलाय. या वक्तव्यावर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. भाजपने हुसेन यांच्या अटकेची मागणी केलीय. तसंच त्यांना अटक झाली नाही तर भाजपने आंदोलनाचा इशारा दिलाय.
In a protest outside ED office in Nagpur, Congress leader and Former City President Sheikh Hussain threatened PM Modi by saying – “Narendra Modi will die a dog’s death”.
Congress Ministers Nitin Rane and Vijay Wadettiwar were also present at the protest.https://t.co/mcHRgKS6HY pic.twitter.com/AEvWUXJKLw
— Maha Vinash Aghadi ᴾᵃʳᵒᵈʸ (@MVAGovt) June 15, 2022
तिकडे काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. आम्ही आता आमचे कर्मचारी AICC कार्यालयही घेऊन येऊ शकत नाही. फक्त दोन मुख्यमंत्रीच इथे येऊ शकतात, अन्य कुणाला प्रवेश नाही असं आम्हाला सांगण्यात आलंय. त्यांनी राहुल गांधींच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना हे महागात पडेल, असा इशारा बघेल यांनी दिलाय.
#WATCH | Delhi: Congress workers outside the Enforcement Directorate office burn tires in protest to the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/eG3Qnq57oX
— ANI (@ANI) June 15, 2022
राहुल गांधी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरु आहे. कथित नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी साडे साठ तास, दुसऱ्या दिवशी तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधींना ईडी चौकशीला बोलावण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले आहेत. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावर टायर जाळण्यात आले.