राहुल गांधींकडून बाळासाहेब थोरातांना बळ देण्याचा प्रयत्न

अहमदनगर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा झाली. पण त्यांच्या सभेपूर्वी नगर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची वेळ पक्षावर ओढावली. ज्या मतदारसंघात राहुल गांधी येणार होते, तिथेच पक्षातील वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना उमेदवाराचा जाहीर प्रचार केला. त्यानंतर राहुल गांधींनीही या सर्व गोष्टींचा आढावा घेतला असल्याचं दिसतंय. संगमनेरमध्ये सभा झाल्यानंतर राहुल […]

राहुल गांधींकडून बाळासाहेब थोरातांना बळ देण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

अहमदनगर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा झाली. पण त्यांच्या सभेपूर्वी नगर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची वेळ पक्षावर ओढावली. ज्या मतदारसंघात राहुल गांधी येणार होते, तिथेच पक्षातील वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना उमेदवाराचा जाहीर प्रचार केला. त्यानंतर राहुल गांधींनीही या सर्व गोष्टींचा आढावा घेतला असल्याचं दिसतंय.

संगमनेरमध्ये सभा झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मुक्काम केला. नगर जिल्ह्याच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि विखे यांचं कधीही जमत नाही. पण विखेंनी आता पक्ष सोडण्याचे संकेत दिल्यानंतर राहुल गांधींनी बाळासाहेब थोरात यांना बळ देण्याचा निश्चय केला असल्याचं बोललं जातंय. याचाच भाग म्हणून त्यांनी संगमनेरमध्ये मुक्काम केला, तर बाळासाहेब थोरातांसोबतचा फोटोही शेअर केलाय.

संगमनेरहून नाशिकला जाताना राहुल गांधींनी बाळासाहेब थोरात यांच्यासोबत फोटो काढला. हा फोटो राहुल गांधींनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. नगर दक्षिणची जागा काँग्रेसला सुटू नये यासाठी काँग्रेसमधूनच काही जणांना प्रयत्न केल्याचा आरोप विखेंनी केला होता. त्यांचा निशाणा थेट थोरातांवर होता. शिवाय त्यांनी राहुल गांधींवरही नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधींनीही आता थोरातांसोबत फोटो शेअर करत विखेंना सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.

विखे पाटील काय म्हणाले?

दक्षिण नगरची जागा काँग्रेसला सोडावी ही मागणी करण्यात आली. शेवटी या जागेवर निर्णय घेऊ, असं सांगण्यात आले. 40 जागांचे निर्णय झाले, पण 8 जागांचा निर्णय झाला नव्हता. त्यात अनेक गोष्टी घडल्या. त्यात सुजय विखेंना दक्षिण नगरमध्ये उमेदवारी दिली जावी अशी मागणी होती. शरद पवार यांनी बाळासाहेब विखेंवर केलेल्या वक्तव्यांना मनाला वेदना झाल्या. नगरच्या जागेसाठी राहुल गांधींनाही भेटलो. भेटीत आलेले अनुभव धक्कादायक आहेत. काँग्रेसला जागा सोडावी अशी मागणी होती, राष्ट्रवादी तयार होत होती. राहुल यांनी राष्ट्रावादी कोणत्या कोट्यातून जागा देणार असे विचारले. त्यांनी मला राष्ट्रवादीतून उभे राहण्यास सांगितले. ते माझ्यासाठी धक्कादायक होते. मला राहुल गांधींनी आमच्या पाठीशी उभे राहावे असे वाटत होते. मात्र, त्यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली. यांचे दुःख झालं. त्यावेळी सुजय विखेंनी त्यांचा निर्णय जाहीर केला, असं राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.