राहुल गांधी म्हणाले – मी काँग्रेस अध्यक्ष आहे, विद्यार्थी हसायला लागले
नवी दिल्ली : देशात सध्या निवडणुकांचं वारं वाहतंय. सर्व नेते थेट जनतेमध्ये जाऊन संवाद साधत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही तरुणांशी संवाद साधताना दिसत आहे. याचाच प्रत्यय दिल्लीत आला. राहुल गांधी एका रेस्टॉरंटमध्ये गेले आणि तरुणांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी तरुणांकडून सल्लेही घेतले आणि देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या रेस्टॉरंटमध्ये जाऊन राहुल गांधींनी रवा-डोसा […]
नवी दिल्ली : देशात सध्या निवडणुकांचं वारं वाहतंय. सर्व नेते थेट जनतेमध्ये जाऊन संवाद साधत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही तरुणांशी संवाद साधताना दिसत आहे. याचाच प्रत्यय दिल्लीत आला. राहुल गांधी एका रेस्टॉरंटमध्ये गेले आणि तरुणांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी तरुणांकडून सल्लेही घेतले आणि देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
या रेस्टॉरंटमध्ये जाऊन राहुल गांधींनी रवा-डोसा खाल्ला आणि नंतर फिल्टर कॉपी प्यायले. यायला उशीर झाल्याबद्दल राहुल गांधींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली. यानंतर सर्वांची परिचय करुन घेतला. एक-एक करुन सर्वांचं नाव विचारलं आणि मग स्वतःची ओळख करुन दिली. ‘मी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष’ अशी ओळख करुन देताच विद्यार्थ्यांनाही हसू आवरलं नाही. 31 डिसेंबरला संसदेतील कामाकाजानंतर राहुल गांधी दक्षिण दिल्लीतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गेले. ते एवढ्या साध्या पद्धतीने गेली, की त्यांना पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं.
राहुल गांधींनी तरुणांशी थेट संवाद करणं आत वाढवलं आहे. अनेक सेमिनारमध्येही राहुल गांधींनी यापूर्वी उपस्थिती लावली आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानची निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी शिमल्याला सुट्टीवर गेले होते. यावेळी ते मुलांसोबत खेळताना दिसून आले होते.
नुकतेच राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यासोबत गोव्यालाही गेले. तीन दिवसांच्या या खाजगी दौऱ्यात त्यांनी सी फूडचा आनंद घेतला. शिवाय अनेक लोकांशी प्रत्यक्ष संवादही राहुल गांधींनी साधला. निवडणुकीच्या दृष्टीने थेट लोकांमध्ये मिसळणं ही राहुल गांधींची अत्यंत महत्त्वाची रणनीती असल्याचं बोललं जातं.