महिनाभरात दुसरा अध्यक्ष शोधा, राहुल गांधींचा काँग्रेसला अल्टीमेटम
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अंतर्गत संकट वाढत चाललंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देण्यावर ठाम आहेत. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी समजूत घालूनही त्यांची भूमिका कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष निवडावा यासाठी राहुल गांधींनी एक महिन्याचा कालावधी दिलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका गांधींना या सर्वांपासून […]
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अंतर्गत संकट वाढत चाललंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देण्यावर ठाम आहेत. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी समजूत घालूनही त्यांची भूमिका कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष निवडावा यासाठी राहुल गांधींनी एक महिन्याचा कालावधी दिलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका गांधींना या सर्वांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. शिवाय कोणत्याही परिस्थितीत प्रियांका गांधींना काँग्रेसचं अध्यक्षपद देऊ नये अशी राहुल गांधींची भूमिका असल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या मते, राहुल गांधींनी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याला सांगितलं की तुम्ही एक महिना घ्या, पण माझा पर्याय शोधा. मी अध्यक्षपद सोडण्यासाठी मनाला तयार केलंय. लोकसभेत नेता म्हणून काम करण्यासाठीही तयार आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करत राहिल, पण अध्यक्ष म्हणून काम करणार नाही, असंही राहुल गांधी म्हणाल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्राचा महापोल : उद्या निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील चित्र काय?
राहुल गांधींची अनेक वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट, प्रियांका गांधी, अहमद पटेल यांनीही राहुल गांधींची समजूत घातली. पण लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष देण्यासाठी मन तयार केलंय.
राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदाच्या शर्यतीत
यापूर्वी राहुल गांधींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मुलांना जिंकवण्याच्या नादात काँग्रेसला हरवलं, असं राहुल गांधी म्हणाले होते. अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलांनीही निवडणूक लढवली. पण गहलोत यांच्या मुलाचा पराभव झाला, तर कमलनाथ यांच्या मुलाने विजय मिळवला.
काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे
अशोक गहलोत यांनी राजस्थानमध्ये 130 सभा आणि रोड शो घेतले. यापैकी 93 सभा जोधपूरमध्ये एकट्या मुलासाठी घेतल्या. परिणामी काँग्रेसचा राज्यातील सर्वच्या सर्व 25 जागांवर पराभव झाला.