राहुल गांधी अमेठीतून आज अर्ज दाखल करणार

अमेठी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विविध ठिकाणचे उमेदवार विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. त्यानुसार आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसकडून भव्य रोड शो आणि शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. अमेठीत पाचव्या टप्प्यात म्हणजेच 6 मे रोजी लोकसभा निवडणूक पार […]

राहुल गांधी अमेठीतून आज अर्ज दाखल करणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

अमेठी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विविध ठिकाणचे उमेदवार विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. त्यानुसार आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसकडून भव्य रोड शो आणि शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. अमेठीत पाचव्या टप्प्यात म्हणजेच 6 मे रोजी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरु आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय अनेक उमेदवार प्रचारदौरा, सभांचे आयोजन करत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे देखील देशभरात प्रचारदौरे करत असून त्यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत चंद्रपूर, वर्धा, पुणे यांसारख्या विविध ठिकाणी प्रचारसभा आयोजित केल्या होत्या.

दरम्यान, आज राहुल गांधी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी वाड्रा उपस्थित राहणार आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास हे तिघेही एका विशेष विमानाने अमेठीकडे रवाना होणार आहेत. राहुल यांचा अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेसतर्फे भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंशीगंज-दरपीपुरच्या रस्त्यावर राहुलच्या भव्य रोड शो आयोजित केला आहे. ‘आर्शिवाद आणि अभिनंदन यात्रा’ असे या रोड शो ला नाव देण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या या रोड शो काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी अमेठीतून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी हा मतदारसंघ मुलगा राहुल गांधींसाठी सोडला आणि त्या रायबरेलीतून लढल्या. राहुल गांधींनी 2004, 2009 आणि 2014 ची निवडणूक अमेठीतून जिंकली. सध्या ते चौथ्यांदा या मतदारसंघातून उमेदवार आहेत. लोकसभा निवडणूक 2014 ला भाजपतर्फे स्मृती इरानी यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र स्मृती यांचा पराभव करत राहुल गांधी विजयी झाले होते. यंदाही भाजपतर्फे स्मृती इरानी यांनाच तिकीट देण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि केरळमधील वायनाड येथून निवडणुकीसाठी उभे राहणार आहे. 4 एप्रिल रोजी राहुल यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 1967 ला निर्मिती झालेला अमेठी मतदारसंघ हा नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला जिंकण्यासाठी कधीही कसरत करावी लागली नाही. 1967 च्या पहिल्या निवडणुकीत विद्याधर वाजपेयी हे काँग्रेसचे अमेठीचे पहिले खासदार ठरले. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. त्यानंतर या मतदारसंघातून त्यांचे चाचा संजय गांधी, राजीव गांधी यांनीही निवडणूक लढवली होती.

संबंधित बातम्या:

राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणार

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.