आदित्य ठाकरे बिहारला तेजस्वी यादव यांना भेटायला का गेले? यामागे कुठले धागेदोरे? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल

खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

आदित्य ठाकरे बिहारला तेजस्वी यादव यांना भेटायला का गेले? यामागे कुठले धागेदोरे? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 5:19 PM

नवी दिल्ली : खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीवर भाष्य केलंय. आदित्य ठाकरे बिहारला नेमके कशासाठी गेले होते? त्यांनी तेजस्वी यादव (Tejswi Yadav) यांची भेट का घेतली? याची चौकशी व्हायला पाहिजे. या भेटीमागच्या हेतूचा उलगडा व्हायला हवा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केली आहे.

काही दिवसांआधी आदित्य यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. आम्ही समवयस्क आहोत. त्यामुळे तेजस्वी यांची भेट घेतली. त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.तरूणांचे प्रश्न, समस्या आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा झाल्याचं आदित्य यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता राहुल शेवाळे यांनी त्यावर भाष्य केलंय.

सुशांतसिंह राजपूत केसबाबतही राहुल शेवाळे यांनी भाष्य केलंय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले होते ते AU यावरून आले होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय, म्हणून हा प्रश्न मी उपस्थित केला, असं शेवाळे म्हणालेत.

खरी माहिती समोर आली पाहिजे.मी जे आज बोललो ते AU बाबतची माहिती लोकांपर्यंत कळावी याबाबत सीबीआयने खुलासा करावा. अन्यथा उद्धव की आदित्य ठाकरे यांनी समोर आलं पाहिजे. उत्तरं दिली पाहिजेत. केंद्रीय गृहमंत्री याबाबत निर्णय घेऊ शकतात, असंही शेवाळे म्हणालेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.