Marathi News Politics Raj Thackeray 16 conditions from Aurangabad police to Raj Thackeray's meeting in Aurangabad
Raj Thackeray : औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्वाच्या भोंग्याचाही’ आवाज दाबवण्याचा प्रयत्न? 16 अटी, शर्थींसह सभेला परवानगी
आज अखेर राज ठाकरे यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अटीशर्थींसह परवानगी देण्यात आलीय. तशी माहिती औरंगाबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अटीशर्थींमध्ये कुणावर वैयक्तिक टीका न करणे, तसंच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी बाळगणे या महत्वाच्या अटींचा समावेश आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
Image Credit source: TV9
Follow us on
औरंगाबाद : मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रान पेटवलं आहे. त्यातच राज ठाकरे यांनी 1 मे, महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत सभा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, औरंगाबाद पोलिसांकडून (Aurangabad Police) राज यांच्या सभेला परवानगी दिली जाणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, आज अखेर राज ठाकरे यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अटीशर्थींसह परवानगी देण्यात आलीय. तशी माहिती औरंगाबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अटीशर्थींमध्ये कुणावर वैयक्तिक टीका न करणे, तसंच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी बाळगणे या महत्वाच्या अटींचा समावेश आहे. त्याचबरोबर राज यांच्या सभेसाठी अजून जवळपास 10 अटी टाकण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या तब्बल 16 अटी
सदर जाहीर सभा दिनांक 01/01/2022 रोजी 4.30 ते 9.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पार्किंगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सूचना द्याव्यात. सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढु नये.
कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नयेत किंवा प्रदर्शन करु नये. तसंच शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करु नये.
हे सुद्धा वाचा
अट क्र. 2,3,4 बाबत समेत सहभागी होणान्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.
सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर / गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांचे कडे घावी.
सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा 15 हजार इतकी असल्यामुळे त्याठिकाणी 15 हजारा पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावे. सभेसाटी येणान्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलिसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती अथवा समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा.सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुषण (नियंत्रण व नियमन) नियम 2000 नुसार परिशिष्ट नियम ३(१) ४(१) अन्वये क्षेत्र औद्योगिक क्षेत्र – 75 डेसीबल, व्यापारी क्षेत्र – 65डेसीबल, निवासी क्षेत्र – 55डेसीबल, शांतता क्षेत्र – 50 डेसीबल प्रमाणे आवाजाची मर्यादा असावी, वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 च्या कलम 15 अन्वये 5 वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. 100000/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळणवळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1959 कलम 36 अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.
सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.
सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बँरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची ( जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.
सदर कार्यक्रमा दरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
हा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपणास घालून दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी.