Raj Thackeray : गुन्हे दाखल झालेले कार्यकर्ते राज्य ठाकरेंच्या भेटीला, सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप
गुडी पाडव्याच्या झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे तात्काळ हटवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. भोंगे हटवले नाहीतर त्या मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावण्यात येईल असं सरकारला ठणकावलं

मुंबई – राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला नाशिकवरून (Nashik) मोठ्या संख्येत मनसेचे (MNS) कार्यकर्ते शिवतीर्थावर आले होते . 4 मे रोजी भोंगा विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये मनसेचे कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे भाग घेतला होता. मात्र आंदोलना दरम्यान पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. नाशिकच्या 38 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केला आहे, त्यात 6 महिलांना तडीपारीची नोटीस दिली गेली आहे. सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे, म्हणून आमच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात आज राज ठाकरेंना भेटून नाशिकच्या कार्यकर्त्यांना अहवाल सादर केला आहे. नाशिकच्या मोठ्या नेत्यांवरती कारवाई केल्याने त्यांना राज ठाकरेंची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे भेटीस आलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याकडून शाब्बासकी देण्यात आली आहे.
तेव्हापासून राज्यातलं राजकारण अधिक तापलं
गुडी पाडव्याच्या झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे तात्काळ हटवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. भोंगे हटवले नाहीतर त्या मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावण्यात येईल असं सरकारला ठणकावलं. तेव्हापासून राज्यातलं राजकारण अधिक तापलं आहेत. दुसऱ्या मुंबईतल्या घाटकोपर येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी हनुमान चाळीसा स्पिकरवरती लावला राज ठाकरे यांच्या या भूमिकेविरोधात देशातल्या अनेक नेत्यांनी टीका केली. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाणे आणि औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत मी माझ्या भूमिकेवरती ठाम असल्याचं जाहीर केलं होतं.




राज्यातल्या कार्यकर्त्यांना नोटीस
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात आली होती. परंतु त्याचबरोबर त्यांना अटी सुद्धा घालण्यात आल्या होत्या. राज ठाकरेंनी अनेक अटी मोडल्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं होतं. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केला आहे. तसेच अनेक कार्यकर्त्यांना नोटिशी देखील दिल्या आहेत.
उत्तर प्रदेशातल्या राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला भाजपच्या खासदारांनी विरोध केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागावी असं खासदारांनी जाहीर केलं आहे.