Raj Thackeray : शरद पवारांवर नास्तिकतेचा आरोप करणारे राज ठाकरेच नास्तिक? व्हायरल पोस्ट आणि त्यामागील सत्य

राज ठाकरे यांनीही शनिवारी पुण्यात हनुमान मंदिरात महाआरती केली आणि हनुमान चालीसा पठणही केलं. राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाचा वार म्हणून शनिवारी हनुमानाची आरती करण्यात आल्यानंतर आता सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या पोस्टमध्ये राज ठाकरे यांना थेट नास्तिक म्हटलं गेलंय.

Raj Thackeray : शरद पवारांवर नास्तिकतेचा आरोप करणारे राज ठाकरेच नास्तिक? व्हायरल पोस्ट आणि त्यामागील सत्य
राज ठाकरेंबाबत व्हायरल पोस्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 11:44 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. गुढीपाडव्याची शिवतीर्थावरील सभा आणि ठाण्यातील उत्तरसभेतही राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात (Loudspeaker in Mosque) आक्रमक भूमिका घेतली. तसंच सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. इतकंच नाही तर सरकारने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिले आहेत. राज यांच्या या भूमिकेनंतर राज्यात शनिवारी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सर्वच राजकीय पक्ष महाआरती आणि हनुमान चालीसा पठणात गुंतल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनीही शनिवारी पुण्यात हनुमान मंदिरात महाआरती केली आणि हनुमान चालीसा पठणही केलं. राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाचा वार म्हणून शनिवारी हनुमानाची आरती करण्यात आल्यानंतर आता सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या पोस्टमध्ये राज ठाकरे यांना थेट नास्तिक म्हटलं गेलंय.

जुन्या बातमीत मसाला भरुन खोट्या माहितीचा प्रसार

राज ठाकरे यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उचलून धरला. शनिवारी हनुमान जयंतीला त्यांनी शेकडो मनसैनिकांच्या उपस्थितीत महाआरती केली आणि हनुमान चालीसाचं पठणही केलं. असं असूनही राज ठाकरे यांना सोशल मीडियावरील पोस्टद्वारे नास्तिक का म्हटलं जातंय? असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण असं की व्हायरल होत असलेल्या बातमीनुसार राज ठाकरे औरंगाबादहून पुण्याला जात असताना जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले होते. त्यावेळी त्यांनी मटणाचा आस्वाद घेतला होता. कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे यांनी हनुमानाचा वार असलेल्या शनिवारीही मटण कसं खाल्लं? असा प्रश्न व्हायरल पोस्टद्वारे विचारला जातोय.

राज ठाकरेंबाबतची ‘ती’ बातमी जुनी

जेव्हा व्हायरल होत असलेल्या बातमीची माहिती घेतली असता ती बातमी कालची नव्हती. तर काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. औरंगाबाद दौरा आटोपून ते पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी केडगाव जवळच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी मटण खाल्लं. मात्र, काही ट्रोलर्सनी जुन्या पोस्टचा आधार घेत खोट्या माहितीचा मसाला भरला आणि ती बातमी पुन्हा एकदा व्हायरल केल्याचं स्पष्ट झालं आहे.

इतर बातम्या :

Mosque Loudspeaker Issue : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ म्हणत इशारा देणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीचा शोध सुरु, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा

Raj Thackeray : ‘राज ठाकरेंना कोर्टाचा हवाला देत खोटं बोलण्याचा अधिकार नाही’, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन कायदेतज्ज्ञांचं आव्हान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.