मुंबई : कोहिनूर मिल खरेदी (Kohinoor Square) प्रकरणाच्या चौकशीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीकडून त्यांची आज चौकशी होत आहे. त्याआधी याच प्रकरणात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर यांचीही ईडीने चौकशी केली.
राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी 10.30 वाजता घरातून ईडी कार्यालयाकडे निघाले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली उपस्थित होते. राज ठाकरे गाडीपर्यंत गेले त्यावेळी त्यांच्या आईने त्यांचा हात पकडला होता. त्यावेळी आईच्या डोळ्यात अश्रू होते.
दोन बडे नेते कृष्णकुंजवर
राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या समन्सविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही आज ईडी कार्यालयावर शांततेत हजेरी लावण्याचा निर्णय घेतला होता. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईतील ईडी कार्यालयात येणार होते. मात्र स्वत: राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत, कोणीही ईडी कार्यालयाकडे न येण्यास बजावलं.
राज ठाकरे आपल्या कुटुंबासह ईडी कार्यालयाकडे गेले. त्यावेळी राज ठाकरे यांची आई घरी होती. त्यांना धीर देण्यासाठी मनसेचे दोन बडे नेते कृष्णकुंजवर दाखल झाले. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे हे दोन्ही नेते कृष्णकुंजवर तळ ठोकून आहेत. दोघेही सकाळी साडेनऊच्या सुमारास राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. राज ठाकरेंनी घराबाहेर पडण्यापूर्वी या दोघांसोबत चर्चा केली असावी.
राज ठाकरेंप्रमाणे बाळा नांदगावकर यांनीही कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाकडे न जाता पक्षादेश पाळण्याच्या सूचना दिल्या.
कोण आहेत बाळा नांदगावकर?
कोण आहेत अनिल शिदोरे?