औरंगाबाद – राज ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे ला असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यात मीडियाला सांगितलं होत. होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अद्याप त्यांच्या सभेला परवानगी मिळाली नसल्याची माहिती मिळतं आहे. मनसैनिक सभा होणार असल्याचं म्हणतं आहेत. राज ठाकरेंना सभेच्या तोंडावरचं एक मोठा झटका बसला आहे. मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे यांची मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. आज भाजपात प्रवेश करतील. मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेऊन भाजपात करणार प्रवेश आहेत. सभेच्या तोंडावरच मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार महिन्यांपूर्वीच सुहास दशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. पदावरून हटवल्यापासून ते नाराज होते. तसेच इतर पक्षांच्या संपर्कात होते. अखेरीस त्यांनी भाजप पक्षात जाणार असल्याचे घोषित केले.
मी धर्मांध नाही मी धर्माभिमानी आहे. 1 मे रोजी चला संभाजीनगर सांगणारा टीजर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या भव्य सभांचे व्हिडीओ वापरून टीजर तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 1 मे रोजी सभेला येण्याचं टीजर मधून आवाहन करण्यात आलं आहे. गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही हनुमान चाळिसा लावणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी सभेत जाहीर केली. त्यांचे पडसाद देशात अजून उमटताना दिसत आहेत. काही नेत्यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेचे समर्थन केलं. तर काही राजकीय पक्षांनी राज ठाकरेंवरती सडकून टिका केली आहे. टिकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी ठाण्यात दुसरी सभा घेतली. त्यावेळी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला औरंगाबादेत आणखी एक मोठा झटका बसला आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावरच औरंगाबाद शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. औरंगाबाद शहराच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी लागू केला जमावबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. आज पासून 9 मे पर्यंत जमावबंदी कायम राहील. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. जमावबंदी आदेशामुळे राज ठाकरे यांच्या सभेसमोर मोठे आव्हान असेल.