आज औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या आहेत. त्यापैकी एक मुंबईत गुढीपाडव्याच्या दिवशी झाली होती. तर दुसरी ठाण्यात सभा झाली. या दोनही सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवरील भोंग हटवण्यासाठी सरकारला तीन मे रोजीचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे. तीन मेला आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.
आम्ही बरेच प्लॅनिंग करून बंदोबस्त लावला होता
सर्व कर्मचाऱ्यांचे कष्ट लागले
सभेत जे काय घडलं, त्याबाबत अद्याप माहिती नाही
या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ
दंगे होणार असतील तर सरकारला अक्कल नाही का
त्यांनी नियम पळायला लावला पाहिजे
4 तारखेपासून आम्ही हनुमान चाळीस वाजवणारच
जे कायदे पाळत नाहीत त्यांना पाहिले अक्कल शिकवा
इस्लाम हा धर्म असा नाही की माझ्या अजानसाठी दूसऱ्यांना त्रास द्या
त्यांना याचा निवडणुकीत किती फायदा होईल हे मला माहिती नाही
हिंदुत्वावरून सध्या देशात एक स्पर्धा सुरू आहे
आम्ही राज्यात अनेक ठिकाणी सभा घेणार
महाराष्ट्रात जे होत आहे, ते भारतात मुस्लिमांविरोधत द्वेष भाजपने पसरवल्याचे उदाहरण आहे
भारताचे मुस्लिम या राजकारणाची शिक्षा भोगत आहेत
हे दोन भावांचं भांडण आहे
अनेक ठिकाणी मुस्लिमांची घरं तोडण्यात येत आहेत
भाजप त्यांना कोर्ट समजून बसले आहे
युवकांना भरकटवण्याचे काम राज ठाकरेंनी केलं
समजाला चांगली दिशा द्यायला हवी होती
राज ठाकरे भाजपच्या इशाऱ्यावर बोलत आहे
भाजप यांना रिमोट कंट्रोलद्वारे चालवत आहे
त्यांचं सरकार असताना का नाही काही केलं
सियासत नफरतो को भरणेही नहीं देती
जभी भरणे आता है जख्म वहा मखी बैठ जाती है
दोन वर्षात महाराष्ट्रातली परिस्थिती भयानक झाली
आपल्याला जीवदान, बोनस लाईफ मिळत आहे
कोरोनात आपण सर्वजण मेलो असतो
तेव्हा औषधं आणि बेडसाठी भांडत होतो
आज तुम्ही त्याबाबत बोलत नाही, महागाईबाबत बोलत नाही
आधीची गोष्ट तुम्ही का उकरून काढत आहेत
मी पोलीस आणि सरकारला विनंती करतो आम्ही याचा विरोध करणार नाही
आणि मुस्लिम जमाजालाही सांगतो, आपण याचा विरोध करायचा नाही
सुप्रीम कोर्टाचा निर्णय रस्त्यावर घेऊ शकत नाही
याने समाजात तेढ निर्माण होईल, हनुमान चालीसा वाचणाऱ्यांवर केसेस होतील
हे चुकीचे आहे, याबाबत विचार करण्याची सर्वांची दिवस आहे
आज महाराष्ट्रचाही जी संस्कृती तुम्ही दाखवली ती कधी नव्हती
आम्ही महापुरुषांचा वापर राजकारणासाठी कधीच केला नाही
मी विरोध करणार नाही, समाज विरोध करणार नाही
पण पोलिसांनी हे बंद करावं
याठिकाणी हुकूमशाही नाही, आम्ही एवढं बोलतो असतो तर आमच्यावर केस केली असती
आतापर्यंत छोट्या गोष्टींसाठी माझ्यावर १२ केस केल्या
सरकार हे प्रकरण कसे हाताळते हे त्यांच्यावर आहे
जीभ आमच्याकडेही आहे, आम्हीही बोलू शकतो
तुमच्यापेक्षा चांगली भाषा आम्ही वापरू शकतो
फक्त तणाव निर्माण करू नका
त्यांच्या सणात मला कोणतही विष कालवायचं नाही
पण चार तारखेपासून ऐकणार नाही
जिथे लाऊडस्पीकर लागतील तिथे दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लागलीच पाहिजे
विनंती करून कळत नसेल तर आम्हाला पर्याय नाही
लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही
आप वेळीच तोंडात बोळा कोंबावा
पोलिसांना विनंती आहे हे वेळीच बंद करा
यांना समजत नसेल तर एकादा काय ते होऊन जाऊदे
लाऊडस्पीकरचा विषय कधी काढायचा नाहीच का
हा नवा विषय नाही, आधीही अनेकांनी मांडला
मी फक्त त्याला पर्याय दिला आहे
तुम्ही गोंगाट करणार असाल तर आम्ही हनुमान चालीसा लावू
मला कुठेही दंगली घडवायच्या नाहीत, मुस्लिमांनी हे समजून घ्यावं
मुस्लिम माझ्याकडे येऊन सांगतात मला भोंग्याचा त्रास होतो
लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे हा धार्मिक विषय नाही
याला धार्मिक वळण तुम्ही देणार असाल तर तुम्हाला धर्मानेच उत्तर देणार
इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्याला लावू नका
यूपीत लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत
कोर्टानेही परवानगी घेण्यास सांगितले आहे.
कोणत्याही मशीदीकडे परवानगी नाही
संभाजीनगरमधी सहाशे मशीदी आहे, इकडे कॉन्सर्ट चालते की काय
सगळे लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत
आमच्या सभेवेळी साईलेंट झोन असल्याचे सांगतात, आणि यांना कुठेही परवानगी
रस्त्यावर नमाज पठणाचे अधिकार तुम्हाला कुणी दिले
पवारांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे
शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तर आहे
पण सर्वात आधी शिवाजी महाराजांचा आहे
आता मी बोलायला लागल्यावर पवार बोलायला लागेल
आधी फोटो पण महाराजांचा नसायचा आता लावायला लागले
मी कुठल्याच जातीची बाजू घ्यायला नाही आलो
तुमचे आमदार निवडूण यावे म्हणून तुम्ही जातीय विष पसरवलं पवारसाहेब
ते लोन आता शाळेपर्यंत पोहोचलं आहे
ज्याच्यावरून पवारांनी दहा पंधरा वर्षे राजकारण केलं
तो जेम्स लेन सांगतो मी कुणालाही भेटलो नाही
तुमची केंद्रात सत्ता होती तर का नाही आणला जेम्स लेनला
रामदास स्वामींनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे लिहलंय, त्यापेक्षा उत्तम लेखन मी बघितलं नाही
राज ठाकरेंनी ते लिखान वाचून दाखवलं
राज ठाकरेंच्या ओळी वाचून दाखवल्या
रामदास स्वामींनी माफी मागतो असं शिवाजी महाराजांना लिहिलं
पण ही माफी नाही ही प्रेम आहे
मराठा समाजाची माथी भडकवली
जेम्स लेनसारखा माणूस उभा केला
ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज देशात घराघरात पोचवले त्यांना पवारांनी उतरत्या वयात त्रास द्यायला सुरू केला
माझं पवारांना सांगण आहे, आम्हाला जातीपातीबाबत भेदभाव शिकवला नाही
छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली
त्यांना आता ब्राम्हण म्हणून बोलणार का
त्यांनी पहिलं वृत्तपत्र काढलं त्याचं नावही मराठा
जेम्स लेनला तेव्हा खेचून आणयाचा होता
आता त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली
राज ठाकरेंनी सभेत जेम्स लेनचे संदर्भा दिला
याबाबत दोन गट आहेत
यांनी जातीचे विष कसे पसरवले ते नीट ऐका
मी प्रबोधनकारांची पुस्तकं आणि त्यातले संदर्भ पवारांना दाखवण्यासाठी आणले आहेत
माझ्या आजोबांनी हिंदू धर्मासाठी केलेलं काम आणि ख्रिश्चिन मिशनरीला विरोध करणारे आजोबा होते
राज्यातला सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते
प्रतापगडावरील भवानीवरील संकट हे वाचा
इतरही पुस्तकं वाचा, आपल्याला पाहिजे ते वाचू नका
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीय द्वेष सुरू झाला
प्रत्येक गोष्ट जातीतून बघायची
आता राष्ट्रवादीच्या सभा बघा
इकदाही पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला नाही
आता मी बोलायला लागल्यावर खोटे व्हिडिओ काढायला लागले
मी नास्तिक बोललेलं पवारांना झोंबलं
मग देवाची पूजा करतानाचे फोटो काढले
तुमची कन्या लोकसभेत बोलली माझे वडील नास्तिक
अजून काय पुरावा देऊ
मी माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत
तुम्हाला अपेक्षित असलेलं तुम्ही वाचलं
बाकीचंही नीट वाचा, ते परिस्थितीला धरून आहे
हिंदू धर्म मानणारा माणूस होता
माझे आजोबा अनेक अनिष्ठ प्रथांच्या विरोधात होते
म्हणून मी पवारांसाठी काही संदर्भ आणले आहेत
राज्याची अब्रू नेते वेशीवर टांगत आहे, रोज काहीही बोलत आहे
येणाऱ्या पिढ्या यांना बघून काय शिकत असतील
हा आपला महाराष्ट्र आहे का, हे काय चालतंय
समाजवादाचा या महाराष्ट्रतून गेला
रोजच्या रोज आमचा महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे
सर्वात जास्त समाजसुधारक महाराष्ट्राने दिले
आज काय महाराष्ट्राची हालत करून ठेवलीय आपण
नेते आई-बहिणीवरून शिव्या घालत आहे
हे तरुणांना हुल्लडबाजी शिकवत आहेत
महाराज म्हणजे एक विचार आहे
त्यानंतर संपूर्ण मराठेशाहीने अटकेपार झेंडे फडकवले
हा इतिहास आप विसलो, आपण फक्त जयंत्या साजऱ्या करतोय
बाबासाहेब म्हणतात, आमच्या लोकांच्या अंगात देवी येते, भूतं येतात
मात्र ज्यादिवशी या देशातल्या लोकांच्या अंगात शिवाजी नावाचं भूत येईल तेव्हा जग पालतं करून टाकू आपण, असे बाबासाहेब म्हणाले
कुणी आलं असेल वेड वाकडं करायला तर तिथल्या तिथेच धरून हाणा
कळूद्या ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे
अल्लाउद्दीलन खिलजीने महाराष्ट्रवार अत्याचार केला
तेव्हाच एकनाथ महाराजांनी दार उघड बये दार उघड अशी हाक दिली
आणि 1630 ला दार उघडलं, आणि छत्रपतींचा जन्म झाला, त्यांनी स्वाभिमान शिकवला
नरहरी कुरुंदर यांच्या पुस्तकात त्यांचं छान वर्णन केलं आहे
महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेब इथं आला
पुन्हा तो कधी परत गेलाच नाही
“औरंगजेबाने पाठवलेल्या पत्रात शिवाजी अजून मला छळतोय”, असा उल्लेख
मला सर्व विषयांची आणि समस्यांची कल्पना आहे
संभाजीनगरचं मूळ नाव खडकी
दोन्ही राजधानी इथल्याच
महाराष्ट्र दिन समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र समजून घ्या
जो इतिहास विसरला तर त्याच्या पायखालचा भूगोल सटकला
या महाराष्ट्राने देशाला काय काय दिलं हे आठवण्याची गरज
ठाण्यातली सभा झाल्यावर दिलीप धोत्रे यांनी फोन केला
संभाजीनगरला सभा घेऊ असे त्यांने सांगितलं
संभाजीनगर हा तर महाराष्ट्रचा मध्य
मग मी तारीख सांगतो नंतर असं सांगितलं
तर हा विषय संभाजीनंगरपुरता मर्यादित नाही
मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार
विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही जाणार
या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही
कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सुर्य उगवतोच
उरल्या सुरलेली संभाजीनंगरमध्ये काढू म्हटलं
राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या भाषणाला सुरूवात
बसायला सोडा पण उभा राहायला पण जागा नाही
अनेक लोक बाहेर उभे आहे
सर्वांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
या सभेबाबत अनिश्चित होती
त्यांनी का ही गोष्ट केली हे मला अजूनही कळालेलं नाही
मी कुठेही सभा घेतली असती तर दूरदर्शनवर तुम्ही पाहिलीच असती ना
गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकजण बडबडायला लागले
मग त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात सभा घेतली
या दोन सभांवर किती बोलत आहे
मोठ्या निवडणुकांसह ग्रामपंचायती जिंकण्याचा मनसेचा निर्धार
राज ठाकरेंनी नेते कार्यकर्ते घडवले, मनसे कार्यकर्त्यांच्या भावना
राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा सभास्थळी
औरंगाबादेत आज मनसेचं भगवं वादळ
मनसेच्या सैनिकांची बाईकवरून रॅली
कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
गद्दारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली-मनसे नेते
राज ठाकरे सभास्थळाकडे निघाले
काही क्षणात राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात होणार
मनसेची औरंगाबादेतील हायव्होल्टेज सभा
भगव्या टोप्या घालून कार्यकर्ते दाखल
औरंगाबादेतलं संपूर्ण मैदान खचाखच भरलं
काही वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
लोक भिंतींंवरही चढून बसले आहेत
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया
आज राज ठाकरे यांची सभा आहे, त्यांना शुभेच्छा
मला पण सभा बघायला आवडते
लोक ती सभा फक्त करमणुकीसाठी बघतात
तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत
काही वेळातच राज ठाकरेंची तोफ धडाडणार
राज ठाकरेंना सभास्थळी नेण्यासाठी गाड्यांचा ताफा सज्ज
औरंगाबादेत मनसेची हायव्होल्टेज सभा
संदीप देशपांडेंचा पुन्हा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
आज आपल्या महाराजांची जयंती आहे
जल्लोषात साजरी करतोय
राष्ट्रवादीला महाराज कधी कळले नाही
म्हणून मिटकरी असे बोलत आहेत
थोड्याच वेळात राज ठाकरे बाहेर येतील
सभास्थळी नेण्यासाठी गाड्या सज्ज
राज ठाकरेंची दमदार एन्ट्री होणार
मुंबईत मुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात पोहोचले
मनसे अध्यक्ष औरंगाबादेतल्या सभास्थळी दाखल होणार
मुंबई देवेंद्र फडणवीसांची मोठ्या शक्तिप्रदर्शासह सभा
थोड्याच वेळात राज ठाकरे निघणार
औरंगाबादेत भगवं वादळ, काही वेळातच राज ठाकरेंची सभा लाईव्ह
अमित ठाकरे आणि राज ठाकरे एकाच वेळी सभेच्या मैदानाकडे निघण्याची शक्यता
अमित ठाकरे अजूनही रामा इंटरनॅशनलमध्येच आहेत
6.30 वाजता राज ठाकरे मैदानाच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता
रुमबाहेर राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक तयार
– राज ठाकरेंच्या भोंगे काढण्याला मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे समर्थन
– राज ठाकरेंनी धर्माला विरोध केला नाही केवळ अनधिकृत भोंग्याला विरोध केलाय
– आमचे राज साहेबांच्या भूमिकेला पूर्ण समर्थन
– राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेचे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल व्हायला सुरुवात
– कर्णपुरा येथे पार्कींग व्यवस्था करण्यात आलीय
– तेथे गाडी पार्क करुन सभास्थळी कार्यकर्त्यांना नेले जात आहे
– ॲटो रिक्षाद्वारे कार्यकर्त्याना सभास्थळी नेले जात आहे
आज सुपारी सभा आहे,, दुपारी झोपायचं आणि रात्री सुपारी घ्यायची
भोंग्याच नात जुने,,मात्र कमळाला कळेल …?
सरडा रंग बदलतो तसे विचार बदलले
भगवी शाल घेतली म्हणजे कोणी बाळासाहेब होऊ शकत नाही
एकवेळा आवाज काढतील, नकला करतील
मनसे सोडून अनेक गेले मात्र आता कोणी येत नाही
गळक्या घरात कोणी येत नाही
टीव्ही 9 मराठीला दिली पहिली प्रतिक्रिया
शिवसेना घाबरली आहे
तपासणी करून मनसे कार्यकर्त्यांना सभा स्थळी सोडायला सुरुवात
मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
-भीम आर्मी प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे यांच्या सह 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
-औंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला जात असताना नगर जिल्ह्यातील नवी खडकी येथे अडविले
-भीम आर्मीचे 15 कार्यकर्ते 3 वाहनांमधून राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी जात होते
– येथून नगर पोलीस स्टेशनमध्ये घेवून जाणारा असल्याची माहिती
– राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेचे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल व्हायला सुरुवात
– कर्णपुरा येथे पार्कींग व्यवस्था करण्यात आलीय
– तेथे गाडी पार्क करुन सभास्थळी कार्यकर्त्यांना नेले जात आहे
– ॲटो रिक्षाद्वारे कार्यकर्त्याना सभास्थळी नेले जात आहे
जळगाव जिल्ह्यातील तालुका व ग्रामीण भागातून मनसे कार्यकर्ता साईबाबा यांचे दर्शन घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघाले आज होणारे राज ठाकरे यांची सभा साठी जिल्ह्यातून नव्हे तर ग्रामीण भागातून कार्यकर्ता निघाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबाद येथे सभा हाेणार आहे. या सभेला हजर राहण्यासाठी भुसावळ येथून पदाधिकारी व कार्यकर्ते वाहनांतून रवाना झाले. जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या नेतृत्वात रवाना झालेल्या पदाधिकाऱ्यांना विशेष पास देण्यात आली आहेत.
भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे
भाजपचे नेते गिरीश महाजनांकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण
मनसेला भाजपचा पाठिंबा नसल्याचे ही केले स्पष्ट
अहमदनगरचे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद येथे दाखल
मनसे नेते अमय खोपकर यांची चंद्रकांत खैरेंवर टीका
चंद्रकांत खैरे हे त्यांच्याच पक्षात अडागळीत पडलेले नेते
खैरेंना नेता म्हणणे हाच मोठा विनोद
राजसाहेबांच्या सभेबाबत खैरेंची टीव-टीव बंद होईल ही अपेक्षा
खोपकर यांनी साधला खैरेंवर निशाणा
मनसे नेते वसंत मोरे कार्यकर्त्यांसह औरंगाबादकडे रवाना
कार्यकर्ते घेऊन वसंत मोरे औरंगाबादेत पोहोचणार
कार्यकर्ते घेऊन वसंत मोरे औरंगाबादेत 5 वाजता दाखल होणार
पुण्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित होते वसंत मोरे
राज ठाकरे यांची सभा, मशीद व मंदिरवरील भोंगे या अनुषंगाने उस्मानाबाद येथे बैठक
पोलीस विभागाने घेतली उस्मानाबाद येथे शांतता समितीची बैठक संपन्न
जातीय सलोखा राखण्याचा संकल्प
उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्या नेतृत्वात शांतता समितीची बैठक
हिंदू आणी मुस्लिम बांधवानी जातीय व सामाजिक सलोखा राखण्याचा संकलप केला
कोणी काहीहीही वक्तव्य केले तरी सामाजिक शांतता राखण्याचा निर्धार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका
हिंदुत्त्वाचा डंका आम्हाला वाजवण्याची गरज नाही
आम्ही कधीच आमच्या भूमिका बदलत नाही
शिवसेना पक्षाच्या भूमिकेवर ठाम
मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
जनतेला सगळे समजते
आधी ते परराज्यातून आले म्हणून त्यांना हकलायचे
आता त्यांनाच जवळ बोलवायचे याला माकडचाळे म्हणतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका
भीम आर्मीचे पदाधिकारी राज ठाकरेंना संविधानाची प्रत भेट देणार
राज ठाकरे संविधान मानत नाहीत त्यामुळे त्यांना आम्ही संविधान भेट देतोय
भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादकडे रवाना
राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादकडे निघाले
राज ठाकरेंनी पोलिसांनी घातलेल्या 16 अटींचे उल्लंघन केल्यास सभा उधळून लावणार
भीम आर्मीचा मनसेला इशारा
पुर्वी दोन विरूध्द दोन होतं, आतातरी तीन विरूध्द एक असं आहे
तीन विचार धारेची लोक एकत्र कशी काय अशी लोकांना शंका आहे
अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. करमणूक
हिंदु आण हिंदु जनतेला असमर्थ समजू नका
आपल्या देशात हिंदू अनेक भाषा बोलतात
माकडाचाळे सुरू आहेत
हिंदुत्व आमचा श्वास आहे, त्यामुळे आमचा डंका आम्हाला वाजवावा लागत नाही.
काहीवेळेला अस्तित्व दाखवण्यासाठी करावं लागतं
आपल्या देशात लोकशाही आहे
मी गोष्टींना गौण मानतो. कोरोना संदर्भात एक बैठक घेतली. त्यामध्ये तुम्ही शांत राहु नका
थाळ्या वाजवा, अंधार करा, दिवा लावा अशी नाटकं केली गेली
भोंग्याचा विषय हा गाजलेला विषय नाही. भोंगा बंदी देशभर करा
केंद्र सरकारने निर्णय घ्या
राज्याला पुढे न्यायचं आहे.
उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या काळात गंगेत प्रेत फेकून दिला. कोरोनाच्य़ा काळात भीषण स्थिती होती.
सर्वांना नियम पाळावं लागणार…ज्यावेळी लाऊडस्पीकर बंद होईल त्यावेळी सगळीकडचे भोंगे बंद होतील
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला जाहीर कार्यक्रम आहे. महाराष्ट्र दिनाची पहिली मुलाखत आहे.
२०१७मध्ये सेनेला छुपं काय चाललंय हे माहीत नव्हतं. तीन पक्षाची युती त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं.
मला खोटं बोलायचं नाही. माझ्या लोकांशी बोलायचं नाही. बोलायचं नाहीत. माझी राजकीय कारकिर्द युतीत झाली. २५ वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच घट्ट झाली होती. त्यावेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हा पर्याय आलाच नव्हता. २०१७ रोजी नेमकं काय होतं की त्यांना युती करावीशी वाटली. त्यावेळी महापालिका निवडणुका होत्या. त्यावेळी शिवसेना भाजपची युती तुटली होती. तिथे तीन पक्षाच्या युतीचा प्रश्न येतो कुठे
दंतकथा म्हटलं तर दाखवयाचे आणि खायचे दात वेगळे होते. त्यामुळे कुठल्या दाताची कुठली कथा
राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे, ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये गर्दी केली आहे. विविध शहरातून, जिल्ह्यातून मनसे सैनिक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. नाशिकचे कार्यकर्ते देखील औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले असून, राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील एका कार्यकर्त्याने हनुमानाचा वेष देखील परिधान केला आहे.
आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा
सभेची तयारी पूर्ण
सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मनसैनिक औरंगाबादमध्ये दाखल
मनसेचे प्रमुख नेते देखील औरंगाबादमध्ये दाखल
राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा
सभास्थळी आणि शहराच्या पोलीस बंदोबस्तात वाढ
सभा स्थळावर सीसीटीव्हीची नजर
राज्यमंत्री बच्चू कडू करणार आज अन्नत्याग
कामगार दिनी आयोजित कामगार आनंद मेळाव्याच्या ठिकाणी मोरारजी कम्पनीचे कामगार आंदोलन करत आहे
भर उन्हात कामगार दिनी कामगारांना आंदोलन करावं लागले याची खंत वाटत असल्याचे सांगून आज बच्चू कडू अन्नत्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितले
औरंगाबादमध्ये आज राज ठाकरेंची सभा
सभेपूर्वी मनसेची रत्नागिरीत बॅनरबाजी
मनसैनिकांनी रत्नागिरीत झळकवले राज गर्जना नावाचे पोस्टर
भगवी शाल पांघरलेले बॅनर्स ठिकठिकाणी झळकले
औरंगाबादमधील लेबर कॉलनीतील महिला राज ठाकरेंच्या भेटीला
लेबर कॉलनीतून हद्दपार करण्यात येत असल्याचा रहिवाशांचा आरोप
राज ठाकरेंना भेटण्यासाठी नितीन सरदेसाईंकडे मागितला वेळ