शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र; महाराष्ट्रात पुन्हा नव्या महायुतीची नांदी?
मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे-शिंदे-फडणवीस एकत्र. सत्ताबदलानंतर महाराष्ट्रात नवं राजकीय चित्र
मुंबई : दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकीय धमाका पहायला मिळाला मिळाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीन दिग्गज नेते आज एकत्र आले. निमित्त होतं ते दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेने आयोजीत केलेल्या दीपोत्सवाचे. मागील दहा वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर मनसेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, यंदाचा दिपोत्सव विशेष ठरला तो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे. महाराष्ट्रात पुन्हा नव्या महायुतीची नांदी पहायला मिळेल अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत(Raj Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि भाजपची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. याची झलक गणेशोत्सवातच पहायला मिळाली. यामुळे नव्या युतीच्या चर्चेला उधाण आले होते.
यानंतर आता पुन्हा एकदा या नव्या युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. शिवाजी पार्कवर शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र आले होते. निमित्त होते दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रगंली आहे.
शिवाजी पार्कवरील कार्यक्रम स्थळी जाण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी गेले होते.
सर्व प्रथम देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी आले. यानंतर काही वेळातच एकनाथ शिंदे देखील यांच्या घरी पोहचले. या नंतर हे तिन्ही एकत्रच शिवाजी पार्कवरील कार्यक्रमस्थळी दाखल झाले.
मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे-शिंदे-फडणवीस एकत्र आले. यामुळे नव्या महायुतीच्या चर्चांना उधाण आले आहे. सत्ताबदलानंतर महाराष्ट्रात नवं राजकीय चित्र पहायला मिळाले आहे. यामुळे यंदा मनसेच्या दिपोत्सवा पेक्षे हे तीन नेते एकत्र आल्याची चर्चाच जास्त रंगली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येण्याआधीपासूनच मनसे भाजपच्या युतीची चर्चा होती. यानंतर शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिंदे-मनसे यांची युती होऊ शकते अशीही चर्चा रंगली होती. मात्र, आता शिंदे-फडणवीस-ठाकरे हे तिन्ही नेते एकत्र आल्याने नव्या युतीची चर्चा रंगली आहे.