Raj Thackeray : ‘धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते, तेव्हा या दोरीला कुणी माघार म्हणत नाही’, राज ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्यात. तसंच फडणवीस यांचं राज ठाकरेंनी तोंडभरुन कौतुकही केलंय.

Raj Thackeray : 'धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते, तेव्हा या दोरीला कुणी माघार म्हणत नाही', राज ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:20 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यात शिवसेनेला यश मिळालं नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्या दिवसापासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडावर होती. फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असं चित्रही सर्वांनी पाहिलं असेल. मात्र, सरकार स्थापनेच्या दाव्यानंतर चित्र पालटलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. तसंच आपण सत्तेच्या बाहेर असू, मात्र हे सरकार चालेल ही माझी जबाबदारी असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. मात्र, अवघ्या दोन तासांत केंद्रीय पातळीवर मोठ्या हालचाली झाल्या आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्यात. तसंच फडणवीस यांचं राज ठाकरेंनी तोंडभरुन कौतुकही केलंय.

‘ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलंय.

राज ठाकरेंच्या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा

श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो….

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी

ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

आपला मित्र

राज ठाकरे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.