Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट! उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले..

Maharashtra Political Crisis : राज ठाकरेंनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर पहिल्यांदाच राजकीय घडामोडींवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट! उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले..
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 1:25 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांच सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट (Raj Thackeray Post on Uddhav Thackeray News) करत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य आहे. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!, असं ते म्हणाले. हिंदीमधूनही राज ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. हिंदीमधून राज ठाकरे यांनी याबाबतची मूळ पोस्ट केली आहे. ‘जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना निजी कर्तृत्व मानने लगता है उस दिन से पतन का प्रवास शुरु होता है’ अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

सरकार पडल्यानंतर पहिलीच पोस्ट

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी रात्री उशिरा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.

हे सुद्धा वाचा

वाचा राज ठाकरे यांचं ट्वीट

राजकीय भूकंपावेळी राज ठाकरे हे रुग्णालयामध्ये होते. त्याच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. त्यानंतर या राजकीय घडामोडींच्या हायव्होल्टेज ड्राम्यादरम्यानच त्यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयातून परतल्यानंतरही राज ठाकरे यांनी राजकीय घडामोडींवर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. अखेर त्यांनी आज सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर राज ठाकरे यांनीही टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयावरही राज ठाकरेंनी वेळोवेळी आपल्या सभांमधून निशाणा साधला होता. दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकार अखेर पायऊतार झालं आहे. अडीच वर्षा सत्तेत राहिल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होतंय.

बंडखोर आमदार मनसेत जाण्याची कुजबूज

दरम्यान, बंडखोर आमदार हे मनसेत जातील, अशीही कुजबूज सुरु होती. सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांना एखाद्या पक्षाची मदत घ्यावी लागू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. दरम्यान, अखेरपर्यंत आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेना सोडणार नाही, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी स्पष्ट केली होती.

Maharashtra Government Formation LIVE Updates : वाचा प्रत्येक घडामोड एका क्लिकवर

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.