Raj Thackeray : आधी नाही म्हणाले, रागावले, पण नंतर राज ठाकरे यांनी त्याला बोलावून घेतलं

मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

Raj Thackeray : आधी नाही म्हणाले, रागावले, पण नंतर राज ठाकरे यांनी त्याला बोलावून घेतलं
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 7:36 AM

अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) यांनी शुक्रवारी एका तरुणाला हटकलं. हा तरुण सेल्फी काढण्यासाठी राज ठाकरे (Selfi with Raj Thackeray) यांच्याकडे हट्ट करत होता. पण राज ठाकरे या तरुणावर आधी चिडले, त्याला नाही म्हणाले आणि नंतर रागावले सुद्धा. अखेर राज ठाकरे यांनी दीपोत्सव कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्याआधी या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांना (MNS Workers) शोधायला लावलं. त्याला बोलावून घेतलं आणि या तरुणाची सोबत सेल्फी काढण्याची इच्छाही पूर्ण केली. राज ठाकरेंनी केलेली ही कृती सगळ्यांचंच लक्ष वेधणारी ठरली.

‘मला त्रास नको देऊ’

फोटो काढलेल्या तरुणासोबत टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. हा तरुण नेमका कोण होता, तो कुठून आला होता, कशासाठी आला होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणाने नेमका किस्सा काय घडला हे सांगितलं. त्याने म्हटलं की,..

मी साहेबांच्या आजूबाजूलाच होते. ते म्हणाले की मला त्रास नको देऊ. नंतर राज ठाकरे शिवतीर्थ घरी जात होते. तेव्हा त्यांनी परत मला बोलावून घेतलं. तो दाढीवाला मुलगा कुठेय, असं म्हणून त्यांनी मला बोलावलं आणि माझ्यासोबत फोटो काढला. मला त्याचा खूप आनंद झाला.

पाहा व्हिडीओ

मनसेच्या दीपोत्सवानिमित्त सायनमधील एक तरुण शिवाजी पार्क इथं आला होता. राज ठाकरेंचा चाहता असलेल्या अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा असते. याच इच्छेसाठी सायनमधील तरुणही आला होता. राज ठाकरेंनी या चाहत्याची फोटोसाठी असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी जी कृती केली, ती त्यांचंही मन जिंकून गेली. राज ठाकरेंप्रती या चाहत्याने आभारही व्यक्त केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.