Raj Thackeray : संजय राऊतांनी एकांतात बडबडण्याची सवय लावावी, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Raj Thackeray : संजय राऊतांनी एकांतात बडबडण्याची सवय लावावी, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर
राज ठाकरे यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 10:08 PM

ठाणे: मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसे च्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याचाच भाग म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच राज ठाकरे यांनी उद्दघाटन केलं आहे. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर देत, संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आता संजय राऊत नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

राजू पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आमदार राजू पाटील हस्ते जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन करण्यात आलं. चंद्रांगण रेसिडेन्सी पहिल्या मजला शिळ रोड दिवा पूर्व येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येन या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राज ठाकरेंनी पुण्यात केलेली संजय राऊत यांची नक्कल

राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. ‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा सवाल करत राज यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती.

इतर बातम्या :

Video : काँग्रेस आमदाराला भागवत कराडांची खुली ऑफर! कैलास गोरंट्याल ‘कमळ’ हाती घेणार?

Goa : विश्वजीत राणेंच्या राज्यपाल श्रीधरन पिल्लईंच्या भेटीनं खळबळ, गोव्यात तर्क वितर्क सुरु