Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, धमक्या आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी जोर धरत होती. आता पोलिसांनी या मागणीची दखल घेत त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, धमक्या आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
गुन्हे दाखल झालेले कार्यकर्ते राज्य ठाकरेंच्या भेटीलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 5:33 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात राज ठाकरेंना धमक्या (Raj Thackeray Threat) आल्या होत्या. तशी तक्रारही मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेत (Mumbai Police) वाढ करण्याची मागणी जोर धरत होती. आता पोलिसांनी या मागणीची दखल घेत त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे नाव राज्याच्या राजकारणात धुडगूस घालत आहे. गुढी पाडव्याच्या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाची भूमिका उचलून धर मशीदीवरील भोंग्याविरोधात रणशिंग फुंकले. त्यानंतर अनेक राजकीय आरोपही झाले. काही संघटनांचा राज ठाकरेंना काडकडून विरोधही झाला तर अलिकडेच राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकी आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

कशी असेल राज ठाकरे यांची सुरक्षा?

  1. सुरक्षेचा दर्जा पूर्वीचच ( Y +) आहे, मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आलीय.
  2. आता राज ठाकरेंच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला आहे.
  3. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते.
  4. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंची पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली होती.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहाता सुरक्षेतील पोलीस कर्मचारी संख्येत करण्यात वाढ आली आहे .

राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरून अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. राज ठाकरेंच्या जीवाला धोका आहे, असे मला वाटत नाही, मात्र त्यांना जर भिती वाटत असेल तर संरक्षण द्यायला काही हरकत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती.  तसेच शिवसेना आणि मनसेतही राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून जुंपली होती. तर हिंदू परिषदेच्या मिलिंद एकबोटे यांनीही राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुंबई पोलीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे आता तरी हा वाद संपेल ही अपेक्षा आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.