राज ठाकरेंनी सांगितलं, आई-बाबांनी वाचन का केलं पाहिजे? मराठी भाषा दिनी महत्त्वाचा संदेश!

हल्ली मराठी पुस्तकं, नियतकालिकं वाचली जात नाही, याची खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.

राज ठाकरेंनी सांगितलं, आई-बाबांनी वाचन का केलं पाहिजे? मराठी भाषा दिनी महत्त्वाचा संदेश!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 1:07 PM

मुंबई : आजकालच्या पिढीत पालकांनी का विविध पुस्तकांचं वाचन का केलं पाहिजे, याचं उत्तर राज ठाकरेंनी आज एका मुलाखतीदरम्यान दिलं. पालक आणि मुलांमध्ये जेव्हा संवाद कमी पडतो. मुलांना पालकांकडून योग्य उत्तरं मिळत नाहीत. त्यांचं समाधान होत नाहीत, तेव्हा ते मूल बाहेरच्या जगात उत्तरं शोधायला जातं. हे मुलाच्या विकासाच्या दृष्टीने अधिक घातक ठरू शकतं. त्यामुळे पालकांनी वाचन केलं पाहिजे. ते सतत वाढवलं पाहिजे, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. मराठी भाषा दिनानिमित्त एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.

विचारांचं तोकडेपण…

हल्ली मराठी पुस्तकं, नियतकालिकं वाचली जात नाही, याची खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. यावेळी ते म्हणाले, विशेषतः आई-वडिलांनी वाचलं पाहिजे. अन्यथा विचारांना तोकडेपणा येतो. ज्यावेळी मुलां हल्ली मराठी पुस्तकं, नियतकालिकं वाचली जात नाही, याची खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. ना कळतं की इथे विचारांचा तोकडेपणा आहे. तो ते बाहेर शोधायला जातो….

हल्लीचे संपादक..

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंनी अत्यंत मोजक्या शब्दात चौफेर राजकीय टिप्पणी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. पूर्वीचे संपादक समाजाला शहाणं करण्यासाठी लिहित असत. मात्र हल्लीचे संपादक मी किती शहाणा आहे, हे समाजाला दाखवण्यासाठी लिहितात, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. शिवसेनेचं मुखपत्र सामनावरून राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

‘मी सामना वाचत नाही’

मी मार्मिक आणि सामना हे दोन्ही वाचत नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं.

मनसेचं मुखपत्र काढणार का?

शिवसेनेप्रमाणे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मुखपत्र काढणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरेंनी स्पष्टच उत्तर दिलं. मी स्वतःच वृत्तपत्र वाचत नाही. त्यामुळे मनसेचं मुखपत्र येण्याचा प्रश्न नाही. सध्या तरी तो विचार नाही, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय.

22 तारखेला बोलणार…

महाराष्ट्रातील राजकारणाच्या सद्यस्थितीवर राज ठाकरे यांनी बोट ठेवलं. पण याबाबत मी अधिक सविस्तर २२ तारखेला बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, म्हातारी मेल्याचं दुःख नाही. काळ सोकावतोय. हे सगळं जे चालू आहे. यावर मी सविस्तर २२ तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्याला बोलणार आहे. कोणताही ट्रेलर. टीझर टाकायचे नाही. महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. विनोद किंवा कोणतीही गोष्ट सगळं आमने-सामने होतं.

‘मराठी भाषा ही समाजाला एकजूट करू शकते’

मनसेच्या वतीने राज ठाकरे यांनी खास संदेश दिला आहे. मराठी भाषा ही समाजाला एकजूट करू शकते, असं वक्तव्य त्यांनी केलंय. याचं स्पष्टीकरण देताा ते म्हणाले, ‘ तुमची मुळात ओळख काय… तर मराठी आहात. म्हणजे कोण. तर मराठी भाषा बोलणारा माणूस किंवा व्यक्ती आहे. भाषा ही तुमची ओळख असते. भाषेने तुम्ही जगात ओळखले जाता. त्यामुळे आपल्या भाषेची आणि आपली ओळख आपणच जपली पाहिजे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.