राज ठाकरेंचे सध्या महाराष्ट्रात स्टँड अप कॉमेडी शो सुरु आहेत : विनोद तावडे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. या टीकेला भाजप नेते विनोद तावडे यांनी त्याच शब्दात उत्तर दिलंय. राज ठाकरेंचे सध्या स्टँड अप कॉमेडी शो सुरु आहेत, नांदेडमध्ये शो झाला, अजून महाराष्ट्रातही शो होतील, असा टोला विनोद तावडेंनी लगावलाय. राज ठाकरेंनी लोकसभेसाठी […]
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. या टीकेला भाजप नेते विनोद तावडे यांनी त्याच शब्दात उत्तर दिलंय. राज ठाकरेंचे सध्या स्टँड अप कॉमेडी शो सुरु आहेत, नांदेडमध्ये शो झाला, अजून महाराष्ट्रातही शो होतील, असा टोला विनोद तावडेंनी लगावलाय.
राज ठाकरेंनी लोकसभेसाठी त्यांचा एकही उमेदवार उभा केलेला नाही. पण त्यांच्या सभांमध्ये ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडून देण्याचं आग्रहाने आवाहन करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असं विनोद तावडेंनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणत्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी, अशी मागणीही आम्ही करणार असल्याचं त्यांनी सांगतिलं.
राज ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली जात आहे. पण राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही, उरले सुरलेले नगरेसवकही पक्ष सोडून गेलेत. त्यामुळे स्वतःचा पक्ष संपला असताना दुसऱ्याला संपवण्याची भाषा हे कशी काय करतात? असा टोलाही विनोद तावडेंनी लगावला.
एकीकडे जगभरात मोदी यांना पुरस्कार देण्याची स्पर्धा सुरु आहे आणि राज ठाकरे यांना मोदी हिटलर वाटतात. पण जगामध्ये हिटलरचं असं कोणीही स्वागत केलं नव्हतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या रिसोर्स टीमने नीट माहिती काढावी आणि ती त्यांना द्यावी. त्यामुळे मोदी यांच्या संदर्भात जे वास्तव जगाला कळाले ते राज ठाकरे यांनाही कळू शकेल, असं विनोद तावडे म्हणाले.