Raj Thackeray : बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार कोण? पुन्हा शिवसेना फुटल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणतात…
आता राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे राजकीय वारसदार असा सूर मनसे नेत्यांनी लावलाय. तर भाजप नेत्यांचाही कौल काही सात तासाच दिसतोय. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज एक मोठा विधान केलंय.
मुंबई : गेल्या एक महिन्यापूर्वी राज्यातलं राजकारण पुन्हा हादरून गेलं. कारण एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना सलग पाचव्यांदा फुटली. सर्वात आधी छगन भजुबळ, त्यानंतर नारायण राणे, राणे यांच्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray), गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर सवाल उपस्थित होऊ लागले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांवर सडकून टीका होऊ लागली. त्यात संजय राऊत हे सर्वांचं टार्गेट राहिले. आता राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे राजकीय वारसदार असा सूर मनसे नेत्यांनी लावलाय. तर भाजप नेत्यांचाही कौल काही सात तासाच दिसतोय. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज एक मोठा विधान केलंय.
बाळासाहेबांचे राजकीय वारसदार कोण?
आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे राजकीय वारसदार आहेत. हे मी आज नाही वर्षानुवर्षे सांगत आलो आणि पुढेही बोलत राहणार. त्याची कारण अशी की ते त्यांच्या अंगा खांद्यावर वाढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना बाळासाहेबांची पूर्ण भावना आणि भूमिका माहिती आहे. बाळासाहेब हे काही व्यक्ती नव्हते तर ते एक विचार होते. ते एक आमच्यावरती संस्कार होते. बाळासाहेब हे एक आम्हाला घेऊन जाणारं मार्गदर्शक नेतृत्व होतं, असे विधान बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना आणि टीकेच्या बाणांना सुरुवात झाली आहे.
आधीही यावरून बराच राजकीय वाद
यावरून आधीही बराच राजकीय वाद झाला आहे. राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं आक्रमक भाषणकौशल्य आहे. त्यांच्या भाषणाला बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाला जशी गर्दी जमायची तशी गर्दीही जमते. बाळासाहेब जसे कुणाचीही पर्वा न करता सडोतोड बोलायचे तसेच राज ठाकरे हेही व्यासपीठावरून आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेताना दिसून येतात. मी बाळासाहेब ठाकरेंमुळे शिवसेना सोडली नाही तर उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजुच्या लोकांमुळे बाहेर पडलो हे राज ठाकरे आजही सांगताना दिसून येतात. त्यातच आता पुन्हा शिवसेना फुटून सरकार पडल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळेच राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचं खरे राजकीय वारदास असल्याचे मनसे नेते म्हणत आहेत.