मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं अधिकृत लाँचिंग?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray may give big responsibility in MNS party) येत्या 23 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात अधिकृतपणे एण्ट्री करणार असल्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray may give big responsibility in MNS party) येत्या 23 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात अधिकृतपणे एण्ट्री करणार असल्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. या चर्चेमुळे सर्वांचे लक्ष मनसेच्या (Amit Thackeray may give big responsibility in MNS party) अधिवेशनाकडे लागले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त नव वर्षात मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात आपली नवी भूमिका घेऊन राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या समोर येतील असं बोललं जात आहे. त्यासोबतचं पक्षाच्या झेंड्यातही बदल करत ते हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याच नव निर्माणाच्या सोहळ्यात पुन्हा एक नवा ठाकरे म्हणजे अमित ठाकरे राजकारणाची माती अंगाला लावणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ठाकरे घराणं गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यापूर्वी आदित्यच्या रुपाने चक्क आदित्य ठाकरेंनी राजकारणात पाऊल ठेवलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. आता ठाकरे घराण्याच्या दुसऱ्या फांदीची तिसरी पिढीही राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.
“तरुण मनसे सैनिकांची ईच्छा आहे की अमित ठाकरेंवर पक्षाची मोठी जबाबदारी दिली पाहिजे. यापूर्वीही अनेकदा मनसे सैनिकांनी राज ठाकरेंकडे ही ईच्छा व्यक्त केली आहे. आता अमितवर कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील”, असं मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
गेल्या दोन वर्षांपासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झालेले आहेत. अमित यांनी यापूर्वी नवी मुंबईतील कामगारांचा मोर्चा, आरे आंदोलन तसेच रेल्वे प्रवाशांच्या समस्येवर आवाज उठवला होता. त्यामुळे याआधीही ते बऱ्याचदा चर्चेत आले आहेत.