Raj Thackeray : गृहमंत्र्यांना आमदार आसिफ शेख यांचं पत्र, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्यापासून महाराष्ट्रातलं (Maharashtra) वातावरण अधिक तापलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राज ठाकरेच्या या भूमिकेवरती टीका देखील केली आहे. महापालिकेच्या निवडणुकाजवळ आल्याने राज ठाकरे हे अशा पद्धतीची वक्तवे करीत असल्याची चर्चा आहे.
मालेगाव – राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्यापासून महाराष्ट्रातलं (Maharashtra) वातावरण अधिक तापलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राज ठाकरेच्या या भूमिकेवरती टीका देखील केली आहे. महापालिकेच्या निवडणुकाजवळ आल्याने राज ठाकरे हे अशा पद्धतीची वक्तवे करीत असल्याची चर्चा आहे. पुण्यात त्यांनी हनुमान जयंती दिवशी एका मंदीरात जाऊन कार्यकर्त्यांसह हनुमान चाळिसाचं पठन केलं. त्यानंतर त्यांनी पुण्यात अनेक ठिकाणी भेटी सुध्दा दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्यात असताना त्यांनी दोन गोष्टी जाहीर केल्या एक म्हणजे 1 मे ला सभा घेणार आहेत. त्यानंतर ते आयोध्या दौरा करणार आहेत. पुण्याच्या पत्रकार परिषदेतील राज ठाकरेंचं वक्तव्य वादग्रस्त आणि चिथावणीखोर असल्याचं आसिफ शेख (Asif shekh) यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्र्यांना पत्र पाठवून गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. दाखल झालेल्या पत्रावरती गृहमंत्र्यालय काय निर्णय घेणार हे काही दिवसात स्पष्ट होईल.
मेळाव्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण पेटलं
शिवाजी पार्कमध्ये गुढी पाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी मशिंदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली. नाही हटवले तर आम्ही मशिदींसमोर हनुमान चाळिसा लावू अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर घाटकोपरमधील मनसैनिकांनी दुसऱ्या दिवशी मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावला. त्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण अधिक तापायला लागलं. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरती टीका केली. राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. असुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंच्या भाषणावरती सगळ्यांना बोलायला बंदी घातल्याने त्याचं अनेकांना आच्छर्य वाटलं आहे.
दोन प्रमुख शहरात दंगलीचे वातावरण निर्माण केले जात
दोन प्रमुख शहरात दंगलीचे वातावरण निर्माण केले जात आहे. सत्ताधारी कडून म्हणजेच भाजपकडून हे सगळे प्रकार केले जात आहे. या आधी कधीही राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी दंगली झाल्या नाहीत. मुंबईमध्ये तुमची ताकत नाही आणि त्यामुळे कोणाला तरी काम दिले आहे. देशांतील प्रमुख महानगरांत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुमच्या हातातून महापालिका जाणार म्हणून तुम्ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतोय, कोरोनानंतर आता कुठे अर्थ व्यवस्था सुरळीत होत आहे. मात्र काही लोकं उगाच अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.