राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या गुप्त भेटीचं ‘राज’ आज फुटणार?

मनसेचं पहिलं महाअधिवेशन आज होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray MNS Adhiveshan) या अधिवेशनात मनसैनिकांना कोणती दिशा देणार याबाबत उत्सुकता आहे.

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या गुप्त भेटीचं ‘राज’ आज फुटणार?
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 9:56 AM

मुंबई : मनसेचं पहिलं महाअधिवेशन आज होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray MNS Adhiveshan) या अधिवेशनात मनसैनिकांना कोणती दिशा देणार याबाबत उत्सुकता आहे. मनसेने झेंड्याचा रंग बदलला आहे, शिवाय आपला अजेंडाही बदलण्याची तयारी मनसेने (Raj Thackeray MNS Adhiveshan) केली आहे. राज ठाकरे आज सकाळी नव्या झेंड्याचं अनावरण करतील, तर संध्याकाळी 6.30 वा कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे यावेळी कोणती भूमिका जाहीर करणार याचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीबाबत बोलणार का याचीही उत्सुकता आहे.

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस गुप्त भेट

खातेवाटप करुन ठाकरे सरकार स्थिरस्थावर होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडी घडताना दिसल्या होत्या. कारण या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 7 जानेवारी रोजी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांची मुंबईत गुप्त बैठक झाली होती. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली होती. (Devendra Fadnavis meet Raj Thackeray)

या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले होते. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास 1 ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.

नवी राजकीय समीकरणे

आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येतील असा अंदाज गेल्या काही दिवसापासून वर्तवण्यात येत होता. तशा चर्चा सुरु होत्या. मात्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने त्या चर्चांना बळ मिळालं. एकीकडे शिवसेनेने भाजपची साथ सोडली. सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात सत्ता स्थापन केली.

सेनेने साथ सोडल्याने भाजपला नवे मित्र शोधणं गरजेचं आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्या पार्श्वभूमीवर भाजपचा नवा साथीदार राज ठाकरे असू शकतात.

संबंधित बातम्या  

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.