मोठी बातमी: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. | Pandharpur Bypoll MNS

मोठी बातमी: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 1:19 PM

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Pandharpur Bypoll ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना पाठिंबा देऊ केला आहे. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखी जड झाले आहे. (MNS give support to NCP Bhagirath Bhalke in Pandharpur Bypoll election)

राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. कोरोनामुळे राज्यावर लॉकडाऊनचे ढग दाटले असतानाही पंढरपुरात सभा घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपूरात सभा घेतल्या होत्या.

कल्याण काळे राष्ट्रवादीत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची (Pandharpur Mangalvedha bypoll) प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केलं. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचारसभेत भाजप नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.

हा भाजपसाठी मोठा धक्का होता. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करत आहे.

“भारतनानांचे अधुरे स्वप्न भगीरथ पूर्ण करेल”

“पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना (दिवंगत आमदार भारत भालके) निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन” अशी हमी अजित पवारांनी दिली.

संबंधित बातम्या 

जयंत पाटलांच्या वक्तव्याने पंढरपूर पोटनिवडणुकीत ट्विस्ट, फडणवीस उमेदवार मागे घेणार? 

बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होईल : गोपीचंद पडळकर

पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो : जयंत पाटील 

(MNS give support to NCP Bhagirath Bhalke in Pandharpur Bypoll election)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.