भगव्या झेंड्यावर राजमुद्रा, राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले

भगव्या झेंड्यावर राजमुद्रा, राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 10:39 AM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण (Raj Thackeray MNS New Flag) केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत.

मनसेच्या महाअधिवेशनासाठी गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर राज ठाकरे हे मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे यांच्यासह सकाळी नऊ वाजताच दाखल झाले. त्यानंतर सव्वादहा वाजताच्या सुमारास मनसेच्या झेंड्याचं राज ठाकरेंनी अनावरण केलं. त्यानंतर पारंपरिक गोंधळ नृत्य सादर करत अधिवेशनाला सुरुवात झाली.

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या गुप्त भेटीचं ‘राज’ आज फुटणार

मनसेने तीन रंगाचा जुना झेंडा बदलून भगव्या रंगाचा ध्वज धारण केला आहे. यातून मनसे हिंदुत्ववादी विचारांची कास धरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुलेखनकार अच्युत पालव यांनी मनसेच्या झेंड्याचं डिझाईन केल्याचं बोललं जात आहे. संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी राजमुद्रा वापरण्यास केलेला विरोध झुगारुन मनसेने नवा झेंडा घेतला आहे.

मनसेच्या महाअधिवेशनसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनसेच्या नेत्यांनी नाराज शिवसैनिकांनाही मनसेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाअधिवेशनात मनसेमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांची मेगाभरती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अमित ठाकरे शिक्षण आणि क्रीडा विषयक ठराव मांडणार आहेत. मनसे विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी अमित ठाकरे यांना व्यासपीठावर तलवार देऊन स्वागत करणार आहेत. महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं शानदार लाँचिंग करण्याची तयारी आहे.

Raj Thackeray MNS New Flag

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.