Raj Thackeray : मनसे नेते औरंगाबादेत, राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, निर्णय उद्या
मनसे नेते राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतल्या सभेला उद्याप परवानगी मिळालेली नाही. याबाबत पोलीस उद्या निर्णय घेणार आहेत. पोलिसांकडून मैदानाची पाहणीही करण्यात आली आहे. औरंगाबादेत सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
औरंगाबाद : मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतल्या सभेला उद्याप परवानगी मिळालेली नाही. याबाबत पोलीस उद्या निर्णय घेणार आहेत. पोलिसांकडून मैदानाची पाहणीही करण्यात आली आहे. औरंगाबादेत (Aurangabad Police) सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी औरंगाबादेत दाखल होत त्या मैदानाची पाहणी केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात बाळासाहेब नांदगावकर पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. आज रात्री बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि पोलीस कमिशनर यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत प्रमुख मनसे नेते आणि औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी हजर असतील. अशीही माहिती समोर आली आहे. औरंगाबादेतल्या या सभेवरून सध्या जोरदार चर्चा आहे. राज ठाकरेंनी हनुमान चालीसा आणि हिंदुत्वावरून भूमिका घेतल्यानंतर राज यांच्या या सभेला मोठा विरोधही होताना दिसून आला आहे.
अनेक संघटनांचा विरोध
राज ठाकरेंच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी विविध संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे पोलीसही सध्या सावध पाऊलं उचलताना दिसून येत आहेत. या सभेच्या तयारीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर हेही औरंगाबादेत दाखल झाले आहेत. त्यांनी त्या मैदानाचीही पाहणी केली आहे. तर सभेला नक्की परवानगी मिळेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सर्व आधीकाऱ्याशी चर्चा करणार आणि उद्यापर्यंत निर्णय घेणार अशी माहिती औरंगाबादचे आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे.
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
सभेची तयारी झालेली आहे, सभा छान होईल, पोलिसांच्या परवानगीमुळे काही अडचण होणार नाही. पोलीसांच्या वरती कोणीतरी आसते, त्यामुळे परवानगीला उशीर होतो. कायदा व्यवस्था कशी राखायची ते आम्हाला सांगायची गरज नाही. पोलीसांच्या मनात काय चालले आहे ते आम्हाला काय कळणार? मी मभेच्या तयारीचा आढावा घेणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच सास्कृतिक मैदानाला ईतिहास आहे, म्हणून आम्ही त्या मैदानावर सभा घेत आहे. बाळासाहेबांचा आदर्श राज साहेंबाच्या समोर आहे, तसेच पवार साहेंबावर बोलण्याएवढा मी मोठा नाही, राज साहोब यावर बोलणार आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. तसेचत जनता हाच मनसेचा भोंगा आहे. दुसऱ्या भोंग्याची आम्हाला गरज नाही. नास्तिक लोक राज साहेबामुळे आस्तिक झाले. नुसत एक मुद्दा राज साहेंबानी घेतला तर एवढे झाले, असेही ते म्हणाले.