Raj Thackeray : ‘बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही’, चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंना टोला; तर औरंगाबादेत राज यांच्या सभेची जय्यत तयारी
राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्यात. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबादेत मोठी सभा घेणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली होती त्याच मैदानावर राज यांची सभा होणार आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठीसह हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध करत राज यांनी सरकारची कोंडी केल्याचं पाहायला मिळतंय. तसंच काल पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) त्यांनी महाआरतीही केली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्यात. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबादेत मोठी सभा घेणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली होती त्याच मैदानावर राज यांची सभा होणार आहे. तर 5 जून रोजी अयोध्या दौऱ्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आलीय. तर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज यांच्यावर टीका केलीय.
चंद्रकांत पाटलांची राज ठाकरेंवर टीका
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कुणी कुठेही सभा घेतली तरी बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही. राज ठाकरे यांची औरंगाबादेत काहीच ताकद नाही. त्यामुळे सभेला यश येणार नाही. पाच हजार खुर्च्या ठेवल्या की मैदान भरल्यासारखे वाटते. सभेला लोक येणार नाहीत. सभेला दुसरेच लोक गाड्या लावतील आणि माणसं पाठवतील, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी मनसे आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. तसंच औरंगाबाद, संभाजीनगरचा मुद्दा संपला आहे. बाळासाहेबांनी या शहराचं नाव आधीच बदललं आहे. मनसे भाजपची कितवी टीम आहे हे शोधावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
मनसेकडून औरंगाबादेतील सभेच्या तयारीला सुरुवात
दरम्यान, राज ठाकरे यांनी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता जोमाने तयारीला लागले आहेत. सांस्कृतिक मंडळाने मैदानासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अद्याप पोलिसांची परवानगी घेणं बाकी आहे. त्यामुळे आजपासूनच परवानगीसाठी मनसे पदाधिकारी कामाला लागेल आहेत. काही झालं तरी राज ठाकरे यांची सभा औरंगाबादेत यशस्वी करुन दाखवणारच असा निर्धार मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केलाय.
इतर बातम्या :