मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सर्व मेळावे, दौरे तात्पुरते स्थगित! नेमकं कारण काय?
आज भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे हा मेळावा तात्पुरता स्थगित केल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे येत्या काही दिवसातील सर्व मेळावे, दौरे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलीय. ते आज ठाण्यात बोलत होते. आज भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे हा मेळावा तात्पुरता स्थगित केल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं. (MNS rally postponed due to Raj Thackeray’s ill health)
मनसे आणि राज ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट आहे. हे मी नाही तर जनताच म्हणतेय. राज ठाकरे यांच्या रक्तात हिंदुत्व आहे. आमच्या झेंड्यातही 60 टक्के भगवा रंग आहे, असं नांदगावकर म्हणाले. कांचनगिरी महाराज आल्या तेव्हा त्यांनीही सांगितलं की राज ठाकरेंची भूमिका ही चांगली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास करा हे राज ठाकरे यांनीच पहिल्यांदा सांगितलं होतं, असंही नांदगावकर यांनी आवर्जुन सांगितलं.
साध्वी कांचनगिरीजी, राज ठाकरे भेट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी साध्वी कांचनगिरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीविषयी बोलताना नांदगावकर यांनी ‘कांचन गुरू माँ आणि राज ठाकरे यांची भेट आणि हिंदू राष्ट्राची कल्पना यावरही त्यांनी भाष्य केलं. मुळात आपला देश बहुसंख्याक हिंदूंचा देश आहे. त्यामुळे साहजिकच आहे की प्रत्येक हिंदू माणसाला वाटणार की हिंदू राष्ट्र व्हावं. त्यात त्यांची काहीच चूक नाही. परंतु परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहली आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जात आहोत. त्यामुळे सर्वधर्म समभाव हे घटनेप्रमाणे चालू आहे. इतर भाषिकही या देशात गुण्या गोविंदाने राहतात. म्हणून ही मागणी काही नवीन नाही. ही जुनीच मागणी आहे.. कांचनगिरी गुरू माँ पण साहेबाना भेटून गेल्या त्यांची पण तीच अपेक्षा आहे’, असं सांगितलं होतं.
‘राज ठाकरेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करणार’
कांचनगिरीजी यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुती सुमने उधळली होती. राज ठाकरे आक्रमक नेते आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते. तेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील असं सांगतानाच उत्तर भारतीयांबाबत राज यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठीच मी मुंबईत आले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, साध्वी कांचन गिरी यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तासभर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. हिंदुराष्ट्र उभारणीच्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.
इतर बातम्या :
नागपुरात भाजपकडून अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता, नेमकं कारण काय?
MNS rally postponed due to Raj Thackeray’s ill health