Raj Thackeray : मुंबईत आला तर ब्रिजभूषण सिंग यांच्या तंगड्या हातात देऊ, राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर आता मनसेकडूनही कडकडीत इशारा
हा सगळा एक ट्रॅप असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी पुण्यातून केला. मात्र तरीही बृजभूषण हे नाव अजूनही चर्चेत आहे. कारण आता बृजभूषण सिंह मुंबईत येऊन सभा घेणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावरून आता मनसेकडून बृजभूषण सिंह यांना कडकडीत इशारा देण्यात आलाय.
रत्नागिरी : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून एक नाव चांगलच गाजतंय. ते म्हणजे भाजप खासदार बृजभूषण (BJP MP Brijbhushan) सिंह यांचं, बृजभूषण खासदार जरी उत्तर प्रदेशातील असले तरी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घोषित झालेल्या आणि पुन्हा रद्द झालेल्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागवी मगच अयोध्येत यावं. अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. या भूमिकेवर ते शवटपर्यंत ठाम राहिले. त्यामुळेच राज ठाकरेंना हा अयोध्या दौरा रद्द करावा लागला. हा सगळा एक ट्रॅप असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी पुण्यातून केला. मात्र तरीही बृजभूषण हे नाव अजूनही चर्चेत आहे. कारण आता बृजभूषण सिंह मुंबईत येऊन सभा घेणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावरून आता मनसेकडून बृजभूषण सिंह यांना कडकडीत इशारा देण्यात आलाय.
खेडेकर यांची सोशल मीडिया पोस्ट
वैभव खेडेकर यांचा बृजभूषण यांना इशारा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा वसा हाती घेतल्यानंतर सुपारीबाज ब्रिजभूषण सिंग याने राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला, एक हिंदू असून एका हिंदूला श्री रामांच्या दर्शनाला येण्यापासून त्याने रोखलं, राज ठाकरेंसोबत येणाऱ्यांना शरयू नदीत बुडवण्याची भाषा त्याने केली, त्याही पलीकडे जाऊन ब्रिजभूषण याने मुंबईत येऊन सभा घेण्याचे नुकतेच ट्विट केले आहे, ब्रिजभूषण याने मुंबईत येऊन दाखवावे , त्याच्या तंगड्या हातात दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, त्याला माझे निमंत्रण आहे हिम्मत असेल तर त्याने मुंबईत येऊन दाखवावे, असे खुले आवाहन मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आज सोशल मीडियावर द्वारे केले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल
राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर राम लल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि या दौऱ्याची देशभर चर्चा सुरू झाली. मग अनेकांच्या पायखालची वाळू सरकू लागली. मग राज ठाकरेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. बृजभूषण सिंह यांचे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर व्हायरल झाली. त्यांना महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली. त्यानंतर बृजभूष सिंह यांनी अशी भूमिका घेतली. मात्र आम्ही नेहमीच एकटे होतो. आम्हाला त्याने फरक पडत नाही, असेही खेडेकर म्हणाले आहेत. तसेच औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यावर काही बोलणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. समस्त मराठी माणसाला डुबवणाऱ्या नालायकाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.