पुण्यात बांगलादेशी तरुण मराठी झाला; मराठी मुलीशी लग्नही केलं : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांचा प्रश्नही पाणी, शिक्षण आणि आरोग्या इतका महत्त्वाचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांचा प्रश्नही पाणी, शिक्षण आणि आरोग्या इतका महत्त्वाचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे (Bangladeshi Intruder in Pune). देशातील घुसखोरांचा प्रश्न किती गंभीर आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरे यानी पुण्यातील एका बांगलादेशी तरुणाचंही उदाहरण दिलं. तसेच त्याने फेरफार करुन मराठी मुलीशी लग्न केल्याचाही दावा केला. राज ठाकरे यांच्या आजच्या (9 फेब्रुवारी) आझाद मैदानावरील मोर्चाला महाराष्ट्रभरातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
राज ठाकरे म्हणाले, “पुण्यात एका बांगलादेशी माणसाने मराठी नाव लावलं. त्यानंतर त्याने एका मराठी कुटुंबातील मुलीशी लग्नही केलं. नंतर कळालं की तो बांगलादेशी आहे. मराठी माणसांमुळे कधीही दंगली झाल्या नाहीत. कारण तो इथला आहे. मात्र, आज भारतात असे अनेक भाग आहेत तेथे बाहेरील देशातील मुस्लीम आहेत. मुस्लिमच काय पण नायजेरियाचे लोकही आले आहेत. ते ड्रग्ज विकतात, मुलींची छेड काढतात. आम्ही फक्त षंढासारखं बघत बसायचं.”
घुसखोरांना माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का? कुठल्याही देशातील लोकांनी यायचं, कुठेही राहायचं. या देशात पाण्याचा, आरोग्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न आहे हेही मला माहिती आहे. मात्र, घुसखोरांचाही प्रश्न तितकाच मोठा आहे. भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. आज जगभरात घुसखोरांवर कारवाई सुरु आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
“देशातील आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे कायदे असतील तर ते चुकीचं”
विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या हेतूंवरही अप्रत्यक्ष शंका व्यक्त केली. तसेच केंद्र सरकार देशातील ढासाळत्या आर्थिक स्थितीवरील आणि प्रश्नांवरील लक्ष हटवण्यासाठी हे करत असेल तर ते चुकीचं असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “आज माझं केंद्र सरकारला सांगणं आहे, की जर तुम्ही देशातील आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे कायदे आणणार असाल तर ते चुकीचं आहे. हे कायदे करणार असाल, तर त्याची कठोर अंमलबजावणी करा.”
संबंधित व्हिडीओ :
Bangladeshi Intruder in Pune