Raj Thackeray : मराठी माणसाला डिवचू नका, बोलून वातावरण गढूळ करू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही.

Raj Thackeray : मराठी माणसाला डिवचू नका, बोलून वातावरण गढूळ करू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 12:12 PM

मुंबई – आपल्याला महाराष्ट्राच्या (Maharshtra) इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल (Governor) हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी (Marathi) माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो अस इशारा राज ठाकरे यांनी राज्यपालांना दिला आहे.

राज्यपालांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

राज्यपालांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राबाबत चुकीचं वक्तव्य केल्याने त्यांच्यावरती महाराष्ट्रातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुध्दा राज्यपालांना संभाळून बोलण्याचा इशारा दिला आहे. राज्यपाल यांचं काल रात्री एक भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राबाबत चुकीचं वक्तव्य केल्याचं अनेक राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी देखील राज ठाकरेंनी जाहीर सभेत टीका केली होती

यापुर्वी देखील राज ठाकरे यांनी जाहीर सभेत राज्यपालांना चुकीची वक्तव्ये करु नका असा इशारा दिला होता. त्याचबरोबर पुन्हा असं वक्तव्यं महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही असं देखील म्हटलं होतं. काल त्यांनी वक्तव्य केल्यापासून शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावरती जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकिय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेधच केलाचं पाहिजे

मुंबईत सर्वजण राहतात. मराठी माणसाच्या रक्तातून मिळालेली मुंबई आहे. मुंबई महाराष्ट्र कष्टकरांच्या देश आहे. मुंबई शंकरशेठ यांनी मुंबई श्रीमंत केली. व्यापाऱ्यांचं मोठे योगदान आहेच. ते सच्चे देशभक्त होते. केंद्रीय तपास यंत्रणा आणि आर्थिक यंत्रणा नाड्या अवळण्याचं काम करत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 जण त्या विषयी कोणती भुमिका घेणार. हिंदुत्वाच्या मुद्दयावर त्यांनी सेना सोडली असं ते म्हणतात. मग हा हिंदुत्वाचा अपमान होत नाही का ? महाराष्ट्राच्या राजकिय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेधच केलाचं पाहिजे. मराठी माणसाला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला अशी टीका संजय राऊत यांनी राज्यपाल यांच्यावरती केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.