मनसेबाबत राज ठाकरेंचा मोठा निर्णय, नागपुरातून मोठी घोषणा
राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
नागपूर : राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी मनसेची (MNS) नागपूरची कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केली आहे. “काल मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो. पक्षाच्या अंतर्गत बदलांबाबत आणि पक्षविस्ताराबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर मी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण शहरातील सर्व पदं बरखास्त करतोय. घटस्थापनेला नवीन पदं जाहीर करणार आहे”, असं राज ठाकरे म्हणालेत.