सर्वात मोठी बातमी! भाजपला सुनावलं, राज ठाकरे म्हणाले, ‘हे’ पंतप्रधानांना शोभत नाही….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

सर्वात मोठी बातमी! भाजपला सुनावलं, राज ठाकरे म्हणाले, 'हे' पंतप्रधानांना शोभत नाही....
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 12:43 PM

पिंपरी-चिंचवड : “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

माझी 2014 ची भाषणं काढून बघा. तेव्हा मी म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांकडे विशेष लक्ष द्यावं, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. अशात मनसे भाजपच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. ते पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एका राज्याकडे पाहु नये, हे मी 2014 ला ही म्हणालो होतो आणि आज ही माझी तीच भूमिका आहे. 2014 नंतर मला ज्या गोष्टी बोललो त्याचं पुढे काय झालं आपण पाहिलं. त्यातल्या काही गोष्टी पटल्या नाहीत. त्यामुळे 2019 ला लाव रे ते व्हिडिओ कॅम्पेन केलं, असं राज ठाकरे म्हणालेत.

राजकारण चांगले बदल व्हायला हवेत. एकमेकांच्या विरोधात बसलेले एकत्र कसे आले? पहाटे शपथविधी घेतात ते का? नंतर बदलतात, असंही राज ठाकरे म्हणालेत.

राजकारण म्हणजे फक्त निवडणुका जिंकणं नाही. राजकारणाला सामाजिक कामाचा आधार लागतो. परिस्तिती बदलायची असेल तर तुम्ही राजकारणात या. मी तुमच्या सोबत काम करायला तयार आहे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना केलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.