Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भाजप-मनसे युती नाहीच? राज ठाकरे पुन्हा 2 दिवसाचा दौरा करणार, मनसेचा नेमका आकडा किती?

भाजप आणि मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची सुरुवातही झाली आहे. पुण्यातही मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत युती करण्याचा आग्रह धरलाय. मात्र स्वत: राज ठाकरे यांनीच युतीची चर्चा थांबवण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय.

पुण्यात भाजप-मनसे युती नाहीच? राज ठाकरे पुन्हा 2 दिवसाचा दौरा करणार, मनसेचा नेमका आकडा किती?
राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 6:01 PM

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचं चित्र पाहायला मिळत असताना दुसरीकडे भाजप आणि मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची सुरुवातही झाली आहे. पुण्यातही मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत युती करण्याचा आग्रह धरलाय. मात्र स्वत: राज ठाकरे यांनीच युतीची चर्चा थांबवण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे पुण्यात नेमकं कोणतं राजकीय चित्र दिसून येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Raj Thackeray orders to stop BJP-MNS alliance talks in Pune)

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभार रचना जाहीर होताच प्रत्येक पक्षानं आतापासूनच कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष हे पुणे महापालिकेकडे लागलं आहे. यंदा पुण्यात भाजपा आणि मनसे युती करावी अशी चर्चा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावरूनच पुण्यात सत्ताधारी भाजपा आणि मनसे एकत्र निवडणूक लढवतील. तशी विनंती आम्ही राज ठाकरे यांच्याकडे करु असं मनसे पदाधिकारी सांगत होते. असं असतानाच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तुर्तास तरी युतीच्या चर्चा थांबवा. वेळ बघून निर्णय घेऊ, असं सांगत पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येण्याचं नियोजन केलं आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

पुण्यात मनसेचे 22 नगरसेवक निवडून येणार?

पुण्यात भाजपा आणि मनसे युतीची चर्चा होताचं भाजपनंही सकारात्मक प्रतिसाद देत युतीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील घेतील असं जाहीर केलं. राज्य सरकारने घेतलेल्या तीन प्रभाग पद्धतीचा निर्णय पाहता भाजपासोबत युती करणं संयुक्तिक आहे, असं मनसेचे स्थानिक पदाधिकारी म्हणत आहेत. कारण हडपसर, कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेची ताकद आहे. हीच ताकद मनसेचे 22 नगरसेवक निवडून आणतील असा विश्वास मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना आहे. पुढील काळात भाजपला महापौर पदासाठी मनसेची साथ घ्यावी लागेल, अशी कुजबुज सध्या पुण्यातील राजकीय वर्तुळात आहे. मात्र आता खुद्द राज ठाकरेंनीच युतीची चर्चा थांबवण्याचे आदेश दिल्यानं मनसैनिकांचं लक्ष राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लागलं आहे.

राज ठाकरे काय आदेश देणार?

राज ठाकरेंनी मागील दोन महिन्यात सातत्याने पुण्याचा दौरा केला आहे. महापालिका निवडणूक ताकदीने लढवण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांच मतं पाहता भाजपा आणि मनसे युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असं असतानाच खुद्द राज ठाकरेंनीच या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. आता येत्या शुक्रवार आणि शनिवारी राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांना काय सांगतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

संजय राऊतांपेक्षा आदित्य ठाकरेंना गोव्याची जास्त माहिती, नितेश राणे यांचा टोला

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा, सुप्रिया सुळेंकडून शिल्पकाराचं कौतुक

Raj Thackeray orders to stop BJP-MNS alliance talks in Pune

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.