Raj Thackeray : उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जातात तर इथं का नाही? राज ठाकरेंचा पुन्हा योगींवरुन उद्धव ठाकरे सरकारला सवाल
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील त्याचबरोबर अन्य धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरु केली. त्यावर राज ठाकरे यांनी योगी सरकारचं पुन्हा एकदा कौतुक केलंय.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. मशिदींवरील भोंगे (Loudspeaker on Mosque) हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. इतकंच नाही तर 3 तारखेनंतर मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पुन्हा एकदा दिले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मशिदींवरील त्याचबरोबर अन्य धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरु केली. त्यावर राज ठाकरे यांनी योगी सरकारचं पुन्हा एकदा कौतुक केलंय.
‘धार्मिक वळण दिलं तर धर्मानेच द्यावं लागेल’
लाऊडस्पीकर अनेकांनी विषय मांडला. मी फक्त त्याला पर्याय दिला. मशिदीवर लाऊडस्पीकर लावणार असाल तर आम्ही मशिदीबाहेर हनुमान चालिसा पढवू. मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. माझी इच्छाही नाही. मुस्लिम समाजानेही ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. नाशिकला एक पत्रकार आले. मुस्लिम समाजातील होते. म्हमाले मी मुसलमान आहे. आम्हाला भोंग्याचा त्रास होतो. माझं लहान मुल लाऊडस्पीकरमुळे झोपेना. ते आजारी पडायला लागलं. झोप लागली तर अजान सुरू होते. मी मौलवींना सांगितलं मुलाला त्रास होतो. तुम्ही मशिदीतच्या आत करा. त्यानंतर त्याने कमी केलं. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. तो धार्मिक विषय नाही. त्याला धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्माने द्यावं लागेल. एवढं लक्षात ठेवावं. इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशाराच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.



‘4 तारखेपासून ऐकणार नाही’
इतकंच नाही तर आ्म्हाला महाराष्ट्रातील शांतता बिघडवायची नाही. उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का उतरवले जाऊ शकत नाहीत? सर्व लाऊडस्पीकर अनधिकृत आहे. पोलिसांना विचारल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. कोर्टाने सांगितलं, किती मशिदींकडे परवानगी आहे, कुणाकडेच नाही. मला कोणी तरी सांगितलं. संभाजीनगरात 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे, अख्खे देशभर आहे. संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली यावे. सर्वांना समान धर्म असला पाहिजे. आम्हाला सभा घेताना हा सायलन्स झोन आहे, शाळा आहे. रात्री कुठे शाळा असेत? हे कुठेही रस्त्यावर उतरून नमाज पढतात. कुणी अधिकार दिला. शासनाला विनंती. आज तारीख 1, उद्या तारीख 2, 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही. हिंदूंना हातजोडून विनंती आहे. जिथे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट हनुमान चालिसा लागली पाहिजे, असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय.