मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायदा, अमित शाहांचं अभिनंदन : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray CAA) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केलं

मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायदा, अमित शाहांचं अभिनंदन : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 21, 2019 | 11:30 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray CAA) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केलं. निवडणुका झाल्यापासून मी काही बोललो नव्हतो. माझीच नव्हे तर सर्व महाराष्ट्राची वाचा खुंटली होती जे काही सुरू होत त्यावरुन. येत्या 23 जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईत होईल. निवडणुकीत काय काय झालं यावरच माझं मत मी अधिवेशनात मांडेन, असं राज ठाकरे म्हणाले.  (Raj Thackeray CAA)

एनआरसी आणि कॅब या विषयाला वेगवेगळे कंगोरे आहेत. आज देशात जे मोर्चे निघत आहे, दंगेसदृश स्थिती आहे, जाळपोळ होत आहे, यातील किती जणांना हे माहिती आहे याबद्दल शंका आहे. या कायद्याबद्दल अमित शाह यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप हुशारीने आर्थिक मंदीवरील लक्ष हटवत याकडे गुंतवून ठेवलं. जर आधार कार्ड आणि मतदान कार्डावर मतदान करता येतं, तर मग नागरिकत्व सिद्ध का करता येत नाही?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

राज ठाकरे काय म्हणाले?

मला कोणत्या मुद्द्यावर काय म्हणायचं आहे यावर मी मनसेच्या अधिवेशनातच भूमिका सांगेल. सध्या देशात गाजत असलेला विषय म्हणजे एनआरसी आणि सीएए.  आज देशात जे मोर्चे निघत आहे, दंगेसदृश स्थिती आहे, जाळपोळ होत आहे. यातील किती जणांना हे माहिती आहे याबद्दल शंका आहे.

या कायद्याबद्दल अमित शाह यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप हुशारीने आर्थिक मंदीवरील लक्ष हटवत याकडे गुंतवून ठेवलं. जर आधार कार्ड आणि मतदान कार्डावर मतदान करता येतं, तर मग नागरिकत्व सिद्ध का करता येत नाही?

135 कोटींच्या देशात आणखी लोकांची गरज काय? आहे त्या नागरिकांनाच सुविधा पुरवता येत नसताना ही नवी टूम कुठून आणली. देशातील पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही. मात्र, मोर्चात असलेल्यांमध्ये भारतातील मुस्लिम किती आणि बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील मुस्लिम किती हे पाहिलं पाहिजे.

माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नाही. भारतात आहेत त्यांच्या चिंता मिटत नाहीत. मग हे आणखी बाहेरचे कशासाठी?

राज्याकडे यंत्रणा आहेत. पोलिसांना कोणत्या देशातून कुठे नागरिक आले आहेत हे माहिती आहे. मात्र, सरकार यावर निर्णय घेत नाही. मुंबईत अशी अनेक ठिकाणं दाखवू शकेल जेथे बांग्लादेशी नागरिक आहेत. यावर सरकारने काम करायला हवं.

बाहेरची लोकं इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर बांग्लादेशी कोठून आले हे दिसतं. नंतर पुन्हा विसरुन जातात. इतरही पक्षांनी या विषयाचा विनाकारण राजकारण करु नये आणि केंद्र सरकारने देखील राजकारण करु नये. आज जे महाराष्ट्रात चालू आहे ते इतकं अस्थिर होण्याचं कारण नाही.

मुंबईत बांगलादेशी मुसलमान आहेत, त्यांच्या वस्त्या कुठे आहेत हे पोलिसांना माहिती आहे. शासकीय यंत्रणा सुधारा. यावरुन भाजपनेही राजकारण करण्याची गरज नाही. जो महाराष्ट्रातील मुसलमान आहे तो दंगली करत नाही. राज्यातील मराठी मुसलमान शांत आहे, कारण त्यांची रोजीरोटी इथं आहे.

इंटरस्टेट मायग्रेशन कायदा आहे. त्यानुसार बाहेरील लोकांची नोंद करावी लागते. जर ही यंत्रणाच राबवली जात नसेल तर कसं काम करणार? महाराष्ट्रात ट्रेनच्या ट्रेन भरुन येतात. भारताच्या आणि नेपाळ, बांग्लादेशच्या सीमा मोकळ्या आहेत. तेथून घुसखोरी होते. जर यंत्रणाच कठोर केली तर हे प्रश्नच तयार होणार नाहीत.

हा विषय हिंदू मुस्लिम असा घेता येणार नाही. इथं आहे त्यांची सोय नाही, बाहेरच्यांना देशात घेऊ शकत नाही. देशातील नागरिकांना नोकरी मिळेना आणि बाहेरचे येऊन येथे नोकरी करत आहे. भाजप राजकारणासाठी याचा वापर करत असेल, तर इतर पक्षही तेच करत आहेत. रस्त्यावर येणाऱ्या लोकांना राजकीय पक्षांचीच फूस.

कायद्यातच गोंधळ आहे. त्याची अंमलबजावणी कशी करणार? जसा गोंधळ नोटबंदीच्या वेळी झाला, तसाच आत्ताही होत आहे. केंद्राने कुणाशी चर्चा करायची हे ठरवू नये, मुद्द्यावर चर्चा करु, मुद्दा कोण मांडतं याचा विषय नाही.

निवडणुकीच्या काळात एक चांगली गोष्ट दिसली, ती म्हणजे निवडणुकीसाठी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांना जनतेनं पाडलं. ती अत्यंत चांगली गोष्ट होती. त्यानंतर या लोकांनी सत्तेसाठी प्रतारणा करावी हे वाईट आहे.

लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीच्या मतदानावरही होऊ शकतो. यांच्या तंगड्या कुठे अडकतात हे पाहायचं आहे. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धतीच अजून कळेना.

24 तारखेच्या निकालानंतर शरद पवारांच्या सभेची सर्वाधिक चर्चा. कोण चाणक्य झाले, कोण योद्धे झाले. हे 23 तारखेपर्यंत कोणी म्हणत नव्हतं. शिवाय 25 तारखेनंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल जे बोललं जातंय, तेही 23 तारखेपर्यंत कोणी बोलत नव्हतं. यशाला बाप खूप असतात, पराभवाला सल्लागार खूप असतात, असं राज ठाकरे म्हणाले.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.